Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागेच्या कारणावरुन वाद करुन अल्पवयीन शेजारी मुलीचा विनयभंग

आरोपीस ०३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.व ५,०००/-रु. दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा येचील मा. श्री.व्ही.पी.आदोने सा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, ०४ वर्धा यांनी आरोपी नामे नितेश शंकरराव मुन वय ४४ वर्ष रा. कवठा (रेल्वे), जि. वर्धा यांस

१) कलम ८ पोक्सो मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व २,०००/-रु. दंड न भरल्यास ०१ महीना सश्रम कारावास

२) कलम १२ पोक्सो मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व २,०००/-रु. दंड न भरल्यास ०१ महीना सश्रम कारावास

३) कलम ३२३ भादवि मध्ये ०१ वर्ष सश्रम कारावास व १,०००/-रु. दंड न भरल्यास ०१ महीना सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली

 फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असुन त्यांचा जागेचे कारणांवरुन वाद आहे. आरोपीने फिर्यादीचे घराजवळ येवुन इंधन टाकण्याकरीता फिर्यादीचे बाथरुमच्या काड्या तोडत असता नमुद फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हिने आरोपीचा हात पकडुन आमचे बाथरुम तोडु नको असे म्हटले असता आरोपीने फिर्यादीचे अल्पवयीन मुलीस हात पकडुन मारहाण करुन शारिरीक संबध करतो असे म्हणुन तिचे विनयभंग केला फिर्यादीचे अल्पवयीन मुलगी व सालदार यांना मारहाण करुन शिवीगाळ केली अशा रिपोर्ट वरुन गुन्हा नोंद आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अप क. १७३/२१ कलम ३५४,३२३,५०४,५०६ भादवि सह ८,१२ पोक्सो नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले.

सरकारतर्फे अति. सरकारी वकील, श्री. एच.पी. रणदीवे यांनी कामकाज पाहीले तसेच त्यांना पैरवी अधिकारी सफौ/१७५ अनंत रिंगणे, पो.स्टे. पुलगांव यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली, शासनातर्फे १२ साक्षीदार तपासले. फिर्यादी, इतर साक्षीदार यांची साक्ष तसेच सरकारी वकीलांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ (श्री.व्ही.पी.आबोने) सा. यांनी आरोपीस दिनांक २९/०८/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये