तळोधी (बा) येथील अप्पर तहसील कार्यालय वाऱ्यावर!
दोन खोल्या आणि अधिकारी प्रभारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड तहसील अंतर्गत अप्पर तहसील कार्यालय तळोधी (बा) येथे गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे मात्र सुरुवातीला अप्पर तहसिलदार ठाकूर रुजू झाले होते. त्या ठिकाणी दोन मंडळ अधिकारी यांचा कारभार आणि विद्यार्थी दाखले देण्याचे काम सुरू होते. अप्पर तहसिलदार शिंदे यांची बदली झाल्याने तेथील प्रभार नागभीड येथील नायब तहसीलदार भानारकर यांचेकडे सोपविण्यात आला आहे.
अप्पर तहसील मुळे जनतेची कामे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना अनेक कामासाठी नागभीड तहसील कार्यालयात यावे लागत असल्याने तळोधी (बा) येथील अप्पर तहसील कार्यालय वाऱ्यावर असून नावापुरते उरले आहे. त्या ठिकाणी दोन खोल्या असून कर्मचारी हे फक्त कॉम्पुटर घेऊन काहीतरी करीत असल्याचे समजते. आमचे प्रतिनिधी यांनी अप्पर तहसील कार्यालयात भेट दिली असता त्यांनी येथील कारभार नागभीड येथून चालतो आणि प्रभार नागभीड येथील तहसिलदार प्रताप वाघमारे यांचेकडे असल्याचे सांगितले.