Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहीहंडी स्पर्धेत चंद्रपुरातील जय शितलामाता मंडळ प्रथम पारितोषिकाचा मानकरी

गोहत्याबंदी हिच खरी जन्माष्टमी ठरेल -कमल स्पोर्टीग क्लब

चांदा ब्लास्ट

 कमल स्पोर्टींग क्लब चंद्रपूर व श्री कृष्ण जन्मोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी कार्यक्रमात बाबुपेठ येथील जय शितलामाता मंडळाच्या गोविंदानी ५ थर उभारून २५ फूट उंचावर असलेली दहीहंडी फोडून प्रथम पारीतोषिकाची मानकरी ठरली. या विजयी चमुचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व रू. १ लाख ११ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला.

स्थानिक विठ्ठल मंदिर वार्डातील टागोर शाळेच्या पटांगणावर हजारों प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार व मनपाचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, कमल स्पोर्टीग क्लबचे अध्यक्ष रघुवीर अहीर, माजी नगर सेवीका संगीता खांडेकर, श्यामल अहीर, हर्षवर्धन अहीर, राजवीर चौधरी, कमल कजलीवाले, राजू घरोटे, विनोद शेरकी, शाम कनकम, प्रदिप किरमे, सचिन कोतपल्लीवार, राजेंद्र खांडेकर, गणेश गेडाम, आशिष मशारकर, धनंजयभाऊ येरेवार, प्रकाश मस्के, निलेश माळवे यांचेसह अन्य मान्यवर अतिथींची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रघुवीर अहीर यांनी दहीहंडी कार्यक्रमामागील कमल स्पोर्टीग क्लबची भुमिका विषद करून या कार्यकमाचे महत्व आणि पावित्र्य जपण्याची सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. गोमाता व दहीहंडी भगवान श्रीकृष्ण यांचे युगानूयुगे नाते लक्षात घेवून गोहत्येला रोकण्यास सामाजिक स्तरावरून प्रखर विरोध झाला पाहिजे असे सांगीतले.

दुध, दही, मिठाई, पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थाचा मुख्य स्त्रोत गोमाता असल्याने व दुग्धजन्य पदार्थामुळे देशाच्या आर्थिक समृध्दीमध्ये भर पडत असल्याने महाराष्ट्रात गोहत्या बंदी अंमलात आणणे हीच खरी जन्माष्टमी ठरेल असेही रघुवीर अहीर म्हणाले.

या प्रसंगी हंसराज अहीर यांनी जन्माष्टमी आणि दहीहंडी याचे पावित्र्य महान असून अशा कार्यक्रमातून युवक युवतींना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत व धाडस व कौशल्य विकसीत होण्यामुळे जीवनात विविध क्षेत्रात यश मिळविणे शक्य असल्याचे अहीर म्हणाले.

आ. किशोर जोरगेवार यांनी कमल स्पोर्टीग क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक व कीडा क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल रघूवीर अहीर यांची प्रशंसा करून त्यांचे हे कार्य समाजाला समर्पित असून युवकांनी यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी किशोर जोरगेवार यांनी महिला गोपिका चमुला 21 हजाराचे प्रोत्साहनपर बक्षिस जाहिर केले. या दहीहंडी स्पर्धेमध्ये जय महाकाली जय गोविंदा चमु बाबुपेठ, एकवीरा मंडळ एकवीरा वार्ड चंद्रपूर, युवक मंडळ गंजवार्ड, गोपिका महिला चमु बल्लारपूर, श्रीराम बालक आखाडा बल्लारपूर आदी मंडळांनी सहभाग घेतला. मान्यवर अतिथींच्या हस्ते या कार्यक्रमात सहभागी गोविंदा व गोपिकांचे सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राहुल गायकवाड, प्रणय डंबारे, जगदिश दंडेले, आशय चंदनखेडे, राजेश खनके, प्रशिक शिवणकर, कृपेश बडकेलवार, मयूर भोकरे, राहुल सुर्यवंशी, चेतन शर्मा व कमल स्पोर्टीग क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुरेख संचालन मोन्टू सिंग यांनी केले. कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्स्फुर्तपणे हजेरी लावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये