Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग

सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

विधानसभा निवडणूक अगदी जवळ आली असतांना भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असुन वरवर महायुती व महाआघाडी दिसत असली तरी या दोन्ही आघाडितील सर्वच घटकपक्ष निवडणुक लढण्याच्या निर्धाराने कामाला लागले आहेत व त्या दृष्टीने त्यांचे दावपेच सुरु झाले आहे. याबरोबरच सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी दिसत असुन प्रत्येक जण आमदारकीसाठी स्वतःला प्रोजेक्ट करीत आहे.

महाआघाडीत प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना व कांग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढण्याची तयारी सुरु आहे. मागील भाजपा शिवसेनेच्या युतीत येथील जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. मात्र राज्यातील राजकीय घडामोडीनंतर येथील राजकीय समीकरण बदललेले आहे. तरीसुध्दा हि जागा शिवसेना ऊबाठा गटाला मिळावी अशी ऊबाठा गटाची इच्छा आहे. मात्र येथे कांग्रेसचे विद्यामान खासदार आहे. त्यामुळे हि जागा कांग्रेसच्या वाट्याला जाईल अशी दाट शक्यता आहे. शिवसेना ऊबाठा गटातर्फे मुकेश जिवतोडे आणी रविंद्र शिंदे यांच्या नावाची चर्चा असुन दोघेही निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने अपार मेहनत घेतांना दिसुन येत आहे. क्षेत्रात या दोघांनी जनसंपर्काचा चांगलाच झपाटा सुरु केला असुन रात्रंदिवस ते संपुर्ण मतदारसंघ पिंजुन काढत आहे.

कांग्रेस मधे अनील धानोरकर यांचे ऊमेदवारीसाठी नाव चर्चेत आहे. त्यांची निवडणुक लढविण्याची पुर्ण तयारी असुन त्यांनी सुध्दा मतदारसंघात फार पुर्विपासूनच मतदारांशी संपर्क साधणे सुरु केले आहे. मात्र ऐनवेळी आमदारकीसाठी खासदारांचे बंधु प्रविण काकडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे हि जागा कांग्रेसच्या वाटेला आल्यास ऊमेदवारीची माळ अनील धानोरकर यांच्या गळ्यात पडेल की खासदार मैडमचे बंधुप्रेम जागे होऊन प्रविण काकडे यांना ऊमेदवारीची लाटरी लागेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महायुतितील भाजप आणी शिवसेना गटही निवडणुकीवर डोळा ठेऊन आहे.

मात्र येथे शिवसेना शिंदे गटाची ताकद अगदीच नगण्य असल्यामुळे हि जागा भाजपच्याच वाट्याला जाईल हे जवळजवळ निश्चीत आहे. त्यामुळे भाजपमध्ये भावी ऊमेदवारांची प्रचंड भाऊगर्दी दिसुन येत आहे.भाजपचे रमेश राजुरकर, अहेमतशाम अली, करण देवतळे यांची नावे चर्चेत असुन किशोर टोंगे यांनी भाजप प्रवेश करुन आपणही शर्यतीत असल्याचे दाखऊन दिले आहे. रमेश राजुरकर यांनी फार पुर्विपासुनच मतदार संघात आपल्या कार्यातुन कामाला सुरुवात केलेली आहे. तर इतर सर्व मतदारांशी संवाद व संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे ऍड. युवराज धानोरकर व नितीन मत्ते यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाला जागा मिळाल्यास निवडणूक लढण्याचा निर्धार ऍड. युवराज धानोरकर यांनी बोलुन दाखविला आहे. तर तिकडे राष्ट्रवादी मध्ये जयंत टेंमुर्डे व विलास नेरकर यांची निवडणूक लढण्याची तयारी दिसुन येत आहे.

मात्र आघाडी व महायुती यांचा काय निर्णय राहिल यावर सर्व अवलंबून असल्याने या केवळ चर्चा व प्रत्येक पक्षाची वातावरण निर्मिती आहे. असे असले तरी सर्वच इच्छुक ऊमेदवारीसाठी आपल्या गुढघ्याला बाशींग बांधुन ऊभे असल्याचे चित्र दिसत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये