Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथकाकडून वाहनासह देशी विदेशीचा आठ लाखाचे वर दारूसाठा व मुद्देमाल जप्त!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा- पो. स्टे. देवळी हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करुन मोक्यावरून मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहनासह देशी, विदेशी दारुचा एकूण 08,16,800 रू. चा मुद्देमाल जप्त केला दि. 29/08/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ची 02 पथके पो. स्टे. देवळी परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून यातील ग्रे रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 32 सी 4188 चा चालक हा कळंब जिल्हा यवतमाळ येथून त्याचे ताब्यातील गाडीमध्ये देशी- विदेशी दारू चा मुद्देमाल घेऊन देवळी ते नांदोरा रोड ने येणार आहे अश्या माहिती वरून पंचासह देवळी ते नंदोरा रोडवर, सरकारी संडास जवळ, देवळी येथे सापळा रचून सदर ठिकाणी नाकेबंदी केली असता सदर वाहन येतांना दिसून येताच सदर वाहन चालकाला त्याचे ताब्यातील वाहन थांबविण्याचा इशारा देताच सदर वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन रोड वर उभे करून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

घटनास्थळावरून सदर स्विफ्ट चारचाकी गाडी चे मधल्या सीटवर व डिक्की मध्ये देशी विदेशी दारू चां माल जप्त मुद्देमाल 1) 11 खर्डाच्या खोक्यात आँफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 528 सिलबंद शिश्या प्रती नग 350/- रू प्रमाने किंमत 1,84,800/- रू.2)01खर्ड्याच्या खोक्यात रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिश्या प्रती नग 350/- रू प्रमाने किंमत 16,800/- रू. 3) 06 खरड्याच्या खोक्यात संत्रा नं. 1 कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 288 सिलबंद शिश्या प्रती नग 150/-₹ प्रमाणे किंमत 43,200 /- रु, 4) 06 खर्ड्याच्या खोक्यात टॅंगो पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम.एल.च्या 600 सिलबंद शिश्या प्रती नग 80/- रू प्रमाने किंमत 48,000/- रू. 5) 03 खर्ड्याच्या खोक्यात प्रीमियम कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम.एल.च्या 300 सिलबंद शिश्या प्रती नग 80/- रू प्रमाने किंमत 24,000/- रू. 6) एक ग्रे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. 32 सी. 4188 किमत 5,00,000 रू *असा एकुण जु.कि. 8,16,800/- चा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीविरुध्द पो. स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

 सदर कारवाई अनुराग जैन पोलीस अधिक्षक वर्धा, सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार मनिष कांबळे, अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे,दिपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये