Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

        शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ह्या मूलमंत्राचा आदर्श समोर ठेवून पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत तसेच युवासेना प्रमुख माजी मंत्री आ.आदित्य ठाकरे, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आ. भास्कर जाधव,युवासेना सचिव वरुन सरदेसाई, विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, पुर्व विदर्भ सघंटक सुरेश साखरे ,चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशात कदम आणि वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख रितेश रहाटे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे (वरोरा आणि राजुरा विधानसभा क्षेत्र) यांनी जिल्ह्यात सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्या पक्षात अनेक कार्यकर्ते सतत प्रवेश घेत आहे.

 आज दि. 27 ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या निवासस्थानी असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश घेतला.न. प. भद्रावती क्षेत्रातील राष्ट्रवादी कॅाग्रेस (अजित पवार गट) जिल्हा सहसचिव प्रज्वल बबन पेटकर, नंदोरी – कोकेवाडा जि. प.क्षेत्रातील कोकेवाडा ( तु. ) ह्या गावातील आष्टा सेवा सहकारी संस्था सदस्य विनोद उध्दव भरडे , सचिन बापूराव चौधरी,रमेश मारोती खिरटकर, श्रावण नामदेव सावसाकडे, प्रशांत सदाशिव भरडे, प्रदिप तुकाराम दाते, भानुदास श्रावण मडावी, माधव संबाजी श्रीरामे, वामन भगवान ठावरी, उद्धव सदाशिव दडमल आणि प्रभाकर रामकृष्ण किटे यांनी पक्ष प्रवेश केला असुन त्यांचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात स्वागत करण्यात आले.

 तालुका प्रमुख नरेद्र पढाल, वरोरा-भद्रावती विधानसभा सघंटक तथा सरपच नंदोरी ग्रा.पं मगेश भोयर, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे,भद्रावती उपतालुकाप्रमुख नदोरी – कोकेवाडा जि. प. तथा संचालक भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समिती गजानन उताने, भद्रावती तालुका युवासेना प्रमुख राहुल मालेकर, नंदोरी -कोकेवाडा जि. प. विभागप्रमुख हरिभाऊ रोडे, कोकेवाडा पंचायत समिती तथा सचालक भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समिती शरद जाभुळकर,पं. स.कोकेवाडा उपविभागप्रमुख युवराज निबुध्दे,चदंनखेडा -आष्टा पंचायत समिती विभागप्रमुख विठ्ठल हनवते यांच्या उपस्थितीत सदर पक्ष प्रवेश पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये