Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपींना सेवाग्राम पोलीसांकडुन 10 तासाच्या आत अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दि. 27/08/2024 रोजी 19.30 वा. सुमारास फिर्यादी शुभम कमलाकर गेडेकार, वय 28 वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, ता. हिंगणघाट, जि. वर्धा हा त्याचा विधी संघर्षीत बालक मित्र व त्याची मैत्रीणीसह फिर्यादीचे मालकीची डस्टन रेडी-गो कार क्र. एमएच-31-एफए-1186 ने नागपुर येथुन कपडे खरेदी करून वि.सं.वा. यास मसाळा, वर्धा येथील त्याच्या आजीच्या घरी सोडुन देण्याकरीता डोडाणी चौकातुन सेवाग्राम रेल्वे पुलाकडे येणाऱ्या नविन बायपास रोडने येत असताना, वि.सं.वा. यास उलटी सारखे वाटत असल्याने त्याने फिर्यादीला कार थांबविण्यास म्हटले. त्यावरुन फिर्यादीने त्याची कार रोडचे वाजुने उभी केली व वि.सं.बा. उलटी करण्याकरीता कारमधुन उतरला. फिर्यादी हा कारमध्ये बसुन ड्रायव्हीग सिटवर बसुन असताना, एक इसम फिर्यादीचे कारजवळ येवुन कारचे गेट उधडुन फिर्यादीच्या पोटाला त्याचेजवळील चाकु लावुन कारबी चाबी काढुन घेतली व दुसऱ्या इसमाने कारचे साईडचे मागील बाजुचे गेट उघडुन कारमध्ये वसला व त्याने त्याचे जवळील चाकु फिर्यादीच्या गळ्याला लावला व पहील्या इसमाने हुसन्या इसमास टाक रे चाकु, हा जास्त फडफड करून राहीला. असे म्हटले असता, दुसऱ्या इसनाने त्याचे दुसऱ्या हाताने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशामध्ये हात टाकुन खिशातील 1) नगदी रु. 50,000/- 2) एक पॉकेट ज्यामध्ये फिर्यादीचे स्वतःचे, भावाचे व वडीलांचे मिळून वेगवेगळ्या बैंकंचे एकुण 9 एटीएम कार्ड, 3 क्रेडीट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड व डस्टन रेडी-गो कार क्र. एमएच-31-एफए-1186 वे आरसी. कार्ड कि. ००/- 3) कारमध्ये ठेवुन असलेले तिन जुने वापरते अॅन्ड्रॉईड मोवाईल एकुण कि रु. 18,000/- असा एकुण जु.कि. रु. 68,000/-रु. चा मुद्दे‌माल जबरीने हिसकावुन व फिर्यादीस चाकुने जखमी करुन ते दोघेही इसमें कारमधुन उतरुन कारसमोर मोटर सायकल घेवुन उभ्या असलेल्या इसमाच्या मोटर सयाकलवर बसुन ट्रिपल सिट पळून गेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन पो.स्टे. सेवाग्राम येथे अप क्र. 661/2024 कलम 309 (6), 35 (3) भारतीय न्याय सहिता -2023 अन्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाच्या तपासात फिर्यादी सोबत असलेला वि.सं.वा. यास सदर गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता, त्याने तपासात सांगीतले की, फिर्यादी याच्या घराशेजारी राहत असुन फिर्यादीचा प्रॉपर्टी डिलींगचा व्यवसाय आहे. तो अंदाजे एक वर्षापासुन त्याचे आजीकडे मसाळा ता. जि. वर्धा येथे राहत असुन तो जे.ई.ई. च्या टयुशन क्लास करीता रामनगर, वर्धा येथे जात असुन त्याची आरोपी  विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा ह.मु. रमेश वाघमारे यांचे घरी किरायाने, रामनगर, वर्धायाचेसोचत ओळख झाली. 15 दिवसापुर्वी ओम निवल हा त्याचा मित्र आरोपी तौसीफ हवीव वेग, वय 22 वर्ष, रा. हनुमान नगर, वर्धा याचेसह वि.स.वा. आर्यन लोहकरे याचे आजीचे घरी मसाळा येथे आला व वि.सं.बा. आर्यन लोहकरे त्याची बर्गमैन गोपेड गहाण ठेवुन असल्याने ती सोडविण्याकरीता त्याला पैशाची गरज आहे. यावरुन विसं.बा. ने आरोपी आरोपी  विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा ह.मु. रमेश वाघमारे यांचे घरी किरायाने, रामनगर, वर्धायाचेसोचत ओळख झाली. 15 दिवसापुर्वी ओम निवल हा त्याचा मित्र आरोपी तौसीफ हवीव वेग, वय 22 वर्ष, रा. हनुमान नगर, वर्धा यांना सांगीतले की, फिर्यादी यास मुलीचा शोक असुन त्यावेजवळ नेहमी रु. 40,000-50,000/- असते. त्यावरुन त्यांनी विसं.बा. ला फिर्यादी याला कोला बोलाव आपण त्याला लुटु व त्याचेजवळील पैसे घेवु असे सांगुन त्याने त्याची मैत्रीणीची लालच द्यायला सांगीतले. त्यावरुन वि.सं.वा. ने फिर्यादीला फोन करुन त्याची मैत्रीण हिचेबाबत असल्याचे सांगुनं ती नागपुर येथे शिक्षण घेत आहे. तिला नागपुर येथे फिरवुन सेवाग्राम येथे सोडणे आहे. त्यावर फिर्यादी तयार झाला व घटना तारखेला वि.सं.बा. सोबत त्याचे कारने नागपुरला गेला. तिथे आरोपी विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा ची मैत्रीण भेटली. तिला फिर्यादीने कपडे खरेदी करुन दिले. आरोपी विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा याने वि.सं.वा. याला फिर्यादीला सोबत घेवुन वर्धा येथे घेवुन येण्यास सांगीतले. त्यावरुन वि.स.वा. ने आरोपी विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा ने सांगीतल्याप्रमाणे घटनेवेळी फिर्यादी व सोबत असलेल्या मुलीसह फिर्यादीचे कारने नागपुर येथुन डोडाणी चौक, वर्धा येथे येवुन सेवाग्राम कडे येणाऱ्या नविन बायपास रोडने येत असताना, वि.सं.बा. ने उलटी आल्याचे नाटक करुन फिर्यादीला कार थांबविण्यास सांगीतले व फिर्यादीने कार थांबविली असता, ठरल्याप्रमाणे घटनास्थळी आधीच थांबुन असलेले आरोपी विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा, तौसीफ हवीव वेग, वय 22 वर्ष, रा. हनुमान नगर, वर्धा  व  जुनेद खान अय्याझ खान, वय 21 वर्ष, रा. शिवनगर, वर्धा यानी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन व त्याला जखमी करुन त्याचेजवळील वर नमुद मुद्देमाल व नगदी असा एकुण 68,000/- चा माल जबरीने हिसकावुन पळून गेल्याचे वयाणात सांगीतले, वरून नमुद गुन्हयात आरोपी विधान उर्फ ओम विजय निवल, वय 21 वर्ष, रा. भिवापुर, ता. जि. वर्धा, तौसीफ हवीव वेग, वय 22 वर्ष, रा. हनुमान नगर, वर्धा  व  जुनेद खान अय्याझ खान, वय 21 वर्ष, रा. शिवनगर, वर्धा यांचा शोध घेवुन त्यांना अटक करून त्यांचेकडुन गुन्हयातील आरोपीतांनी जबरीने हिसकावुन नेलेली काही रक्कम व एक हत्यार जप्त करण्यात आलेले आहे गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री. अनुराग जैन, गा. अपर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर पो.नि. स्था.गु.शा. श्री विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार स.पो.नि. श्री विनित धागे, पो.उप.नि. संतोष चव्हाण, पो.हवा. हरीदास काकड/265, पो.हवा./262 सचिन सोनटक्के, पा. हवा./528 मंगेश झांबरे, ना.पो.अं./915 गजानन कठाणे, पो.अ./1494 अभय इंगळे, म.पो.अं./1288 वैशाली करमणकर व चा.पो.हवा./313 विलास लोहकरे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये