Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविकास आघाडी सावली तालुकातर्फे शांती मुक मोर्चा व जाहीर निषेध

बदलापूर येथील घटनेचा काळी फित बांधून महायुती सरकारचा निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलीय. या घटनेनंतर सर्वत्र संतपाची लाट पसरलीय.हजारोंच्या संख्येत बदलापूरमधील नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानाकात रेल्वे रुळांवर उतरून नागरिकांनी रेल्वेमार्ग रोखून धरला होता,पश्चिम बंगालमधील कोलकात्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानं देशभरात संतापाची लाट असतानाच, महाराष्ट्रातील बदलापूरच्या तसेच नागभीड येथील या घटनेनं त्यात भर घातलीय. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

बदलापुरातल्या अत्याचाराच्या या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगाराला तातडीनं शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यातील महाविकास आघाडी आक्रमक झाली असून महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले होते परंतु उच्च न्यायालयाने बंद ठेवण्यास नकार दिला,करिता महाविकास आघाडी तर्फे राज्यभर काळी फित बांधून मुक मोर्चा काढण्यात आला.आज जनसंपर्क कार्यालय सावली ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांच्या पुतळ्या पर्यंत शांती मुकमोर्चा काढण्यात आला.महायुती सरकारच्या काळात महिलावरील वारंवार होणाऱ्या अत्याचारावर विविध मान्यवारांनी खंत व्यक्त केली व सदर घटनेचा निषेध केला.

याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुकाध्यक्षा उषाताई भोयर,शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,नगराध्यक्षा लताताई लाकडे,युवा शहराध्यक्ष अमरदीप कोणपत्तीवार,महिला शहराध्यक्ष भारती चौधरी,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार,मधुकर मेडपलीवार,प्रफुल वाळके,सचिन संगीडवार अंतबोध बोरकर,नगरसेविका अंजली देवगडे,ज्योती शिंदे,सीमा संतोषवार,पल्लवी ताटकोंडावार,कविताताई मुत्यालवार,मोहन गाडेवार,अनिल गुरुनुले,सुनील पाल, मिथुन बाबनवाडे,रुपेश किरमे,पंकज सुरमवार,किशोर घोटेकर,सुनिल ढोले,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,युवा पदाधिकारी आशिष खोब्रागडे,अमन खोब्रागडे,कुणाल मालवनकर,अक्षय घोटेकर,अवेश देवगडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये