Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा पोलीस दलात 90 पदांची भरती

"मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" या उपक्रमा अंतर्गत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आशीर्वाद मंगल कार्यालय, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे दिनांक २४-०८-२०२४ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” या उपक्रमा अंतर्गत वर्धा जिल्हा पोलीस दलात 90 पदांची भरती करण्यात येणार आहे त्याकरिता ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने 296 उमेदवारांनी फॉर्म भरले. सदरच्या उमेदवारांना दि. 24.08.2024 रोजी कॉल करून आशीर्वाद मंगल कार्यालय, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे सकाळी 10.00 वाजता बोलविण्यात आले होते. त्यापैकी हजर आलेल्या 100/120 उमेदवारांची माननीय पोलीस अधीक्षक वर्धा व समितीने मुलाखत घेऊन तसेच डॉक्युमेंट चेक करून एकूण 12 लोकांची नियुक्ती केली. नियुक्त झालेल्या उमेदवारांना वर्धा पोलीस दलामधील वेगवेगळ्या विभागातील जसे डाटाएन्ट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, मोटर परिवहन विभाग व बिनतारी संदेश विभाग येथे त्यांची नेमणूक करण्यात आली.

50 उमेदवारांचे मुळ प्रमाणपत्र पडताळणी तसेच मुलाखत घेण्यात आली असून त्यांचे नियुक्तिपत्र दि. 26.08.2024 रोजी देण्यात येणार आहे. उर्वरित 38 जागेकरीता येणाऱ्या उमेदवारांची दि. 26.08.2024 रोजी मुळ कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत करूण नियुक्ती करण्यात येईल.

जे उमेदवार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र आहेत ज्यांनीhttps://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी केली आहे असे उमेदवार किंवा ज्यांना नोंदणी करण्यात काही अडचण येत असल्यास त्यांनी सोमवार दिनांक 26/08/2024 रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय, पोलीस मुख्यालय, वर्धा येथे सकाळी 10.00 वाजता प्रत्यक्ष मुलाखती करिता मुळ कागदपत्रासह दोन झेरॉक्स प्रत घेउन हजर रहावे. नमुद ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची व्यवस्था केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये