Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बलात्कार निषेधार्थ महिला काँग्रेसचे डोळ्यावर काळ्या फिती बांधून आंदोलन 

आरोपीना आठ दिवसात भर चौकात जाहीर फाशी द्या!

चांदा ब्लास्ट

घुग्घूस (चंद्रपूर) : कोलकाता येथील महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची नृशंस हत्या करण्यात आली या घटनेने सर्वत्र दहशत माजली असतांना महाराष्ट्रात बदलापूर आदर्श विद्यालय शाळेत चार व सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलीवर शाळेत तेथीलच सफाई कर्मचाऱ्यांनी बलात्कार केला या पाठोपाठ कोल्हापूर येथे दहा वर्षीय मुलीवर बलात्कार व हत्या करण्यात आली तसेच अमरावती येथे ही चौदा वर्षीय मुलीवर शाळेतील शिक्षकांने बलात्कार केल्याचा किळसवाना व संतप्त प्रकार समोर आला आहे.

 संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांनी कळस गाठला आहे मुख्यमंत्री व गृहमंत्री पूर्णतः निष्क्रिय झाले असून ते केवळ परत राज्यात सत्ता प्राप्ती कशी करता येईल याकडेच लक्ष देत असल्याचा आरोप करीत महिला काँग्रेस तर्फे प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद व महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डोळ्यावर काळ्या फिती बांधून व महाराष्ट्र शासन मुर्दाबादच्या घोषणा देत महिलांनी आपला संताप व्यक्त करीत आरोपीना भर चौकात फाशी द्या गृहमंत्री देवेद्र फडणवीस राजीनामा द्या अशी मागणी केली.

 राज्यातील बलात्कार व वाढती गुन्हेगारीवर डोळे झाक पणा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध हे डोळ्यावर काळी फिती बांधून निषेध नोंदविला व पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांना निवेदन दिले.

 याप्रसंगी सरस्वती पाटील, संध्या मंडल, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, निलीमा वाघमारे, शौर्य वंदना संस्थेचे अध्यक्ष आरती कैथल, संगीता बावस्कर, अश्विनी धुर्वे, नंदा आत्राम, पूजा वर्मा, लक्ष्मी गोदारी, सगुणा अक्का, ईश्वरी अक्का, दुर्गा अम्मा, वंदना क्षीरसागर, कल्पना लोणे, बेबी मारेकर, चंदा दुर्गे, अनिता मुंडे, अर्चना परचाके, कांचन वर्मा, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, अनिरुद्ध आवळे, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, मोसीम शेख, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेख शमिउद्दीन, सुनील पाटील, शहशाह शेख, प्रकाश वर्मा, अंकुश सपाटे व मोठया संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये