Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवपांदन रस्त्यासाठी चिखलात बसून आंदोलन

९० वर्षांपासून चिकणी गावातील शेतकरी पांदन रस्त्याच्या प्रतिक्षेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील जवळपास १५० शेतकरी ९० वर्षांपासून पांदन रस्त्यासाठी प्रतिक्षेत आहे. शेतकऱ्यांना जाण्यायेण्याचा मार्ग असलेला शिव पांदन रस्त्याला प्रशासनाने काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही. प्रशासन व जनप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे पांदन रस्त्याचे काम झालेच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनसे तर्फे १९ ऑगस्ट लाख प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ शिवपांदन रस्त्याचे काम करण्याची मागणी केली. प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने येथील शेतकरी संतापले आहे त्यामुळे त्यांनी आज दिनांक २३ऑगस्ट ला दुपारी ३.०० वाजेपासून चिखल झालेल्या रस्त्यावर चिखलात आंदोलन सुरु केले आहे.

     सुनील खापने यांनी सांगितले की,या पांदन रस्त्याने जवळपास १५० शेतकरी ये जा करतात, परंतु या रस्त्यावर एवढे चिखल झाले आहे की शेतकऱ्यांना यावरून पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे, त्यामुळे प्रशासनाने त्वरित या पांदन रस्ता बांधकामाची सुरुवात करावी अन्यथा आम्ही या चिखलातून बाहेर येणार नाहीं असा इशारा आंदोलनकर्ते यांनी प्रशासनाला दिला आहे.

  त्यांनी पुढे सांगितले की, चिकणी या गावावरून सुरू झालेला हा पांदन रस्ता दहेगाव पर्यंत जवळपास ६ किलोमीटर पर्यंत खराब आहे, या परिसरातील शेतात निंदन खुरपण करण्यासाठी महिला येत नसल्यामुळे शेतीची कामे नाहीं त्यामुळे वेळेवर शेतीची मशागत होतं नाहीं पर्यायाने शेतीमध्ये उत्पादन होतं नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होतं आहे, जवळपास ९० वर्षांपासूनचा हा पांदन रस्त्या अजूनही झाला नाही. त्यामुळे या मार्गे जाणारे शेतकरी प्रशासनाविरोधात संतापले आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणारे शासन शेतकऱ्यांचवर एक प्रकारे सुड उगवित आहे. गावकऱ्यांनी पांदन रस्ता न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे.

    शिव पांदन रस्त्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे हे पांदन रस्त्यावर असलेल्या चिखलात उतरून आंदोलन करत आहे, या आंदोलनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हा जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, मोहित हिवरकर, प्रतीक मुडे उपस्थित झाले असून गावातील बंडू दातारकार, प्रभाकर खोके, संजय बोधे, सुनील बोधे, नानाजी टोगे, कमालाकार ढेंगळे, मारोती दातारकार, सुधाकर ढेंगळे, पत्रू बोधे, चिंधू खापने, मनोहर खापने, पुरुषोत्तम खापने, सुनील खापने, मेघशाम बोधे, मंदाबाई दातारकार, पपीता खारकार, निलेश खारकार, पांडुरंग खारकार, माधव गुजराकर, मनोहर पाल, रामदास देहारकार, गुलाब खापने, सोमेश्वर खापने, विनायक खापने, श्रीधर माणेकर, मनीषा मेश्राम, मंजुषा वानखेडे, प्रीतीताई फुलकर, वैशाली लाकडे, विठ्ठल ताजने गोपाल, ताजने, भीमाजी कौरासे इत्यादी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये