Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

बस स्थानकावरील प्रसाधन गृहात मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्याचार – 5 आरोपींना पोलिसांनी केली अटक

अत्याचाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पोलिसांनी घेतली तत्काळ दखल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

देशभरात अत्याचाराची प्रकरणे ठळकपणे समोर येत असुन महाराष्ट्रातही हिच परिस्थिती दिसत असुन राज्यात महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार वाढत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या मतदार संघात एका चिमुरडीवर अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत आहे. विरोधी पक्ष मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांच्या ब्रम्हपुरी मतदार संघापासून अवघ्या 20 किमी अंतरावर असलेल्या चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभिड येथे मनोरुग्ण महिलेवर पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार करून सदर अत्याचाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार नागभीड येथील बसस्थानकाच्या प्रसाधनगृहात मनोरूग्ण महिलेवर 5 नराधमांनी अतिप्रसंग करून व्हिडीओ व्हायरल केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागभीड पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्हॉट्स ॲपवर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती होताच, या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत नागभीड पोलीसांनी तीन तासांत व्हिडिओमधील आरोपींचा शोध घेत अटक केली.
१२ ऑगस्टला मध्यरात्री सुमारास पीडित मनोरुग्ण महिला नागभीड बसस्थानक परिसरात एकटी असताना सदर महिलेला आरोपींनी प्रसाधनगृहात नेऊन तिच्यावर एका आरोपीने बळजबरीने अतिप्रसंग केला. तर, दुसऱ्या आरोपीने मोबाईलवर त्याचे व्हिडीओ काढला व इतर आरोपींनी गुन्हा करण्यास सहकार्य केले. सदर आक्षेपार्ह व्हिडीओ यातील एका आरोपीने मित्राच्या व्हॉटस्ॲपवर पाठविले. त्याने सदर व्हिडीओ मित्रांच्या व्हॉट्स ॲपद्वारे पाठवून व्हायरल केला. सदर व्हिडिओ संदर्भात माहिती पोलिसांना मिळाली. या व्हिडिओची पोलिसांनी तत्काळ दखल घेवून व्हिडीओ मधील पीडित महिलेची शोध घेतला व तिची ओळख पटविली. यानंतर व्हिडीओ मधील आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पोलीस पथके तयार करण्यात आली. पोलिसांच्या पथकांनी मोहीत उमर शेख (१९), हरी नारायण सुनील मांढरे (३०), कार्तिक प्रमोद बनकर (२४), कृणाल रामू पाठक (१९) यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असत, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीविरूद्ध नागभीड पोलिसांनी कलम ६४ (२),(क), ७० (१), ८७, १२६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ६७, ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविला.
सदर प्रकरणाची माहिती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी तत्काळ नागभीड येथे भेट देवून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मनोरुग्ण महिलेस तातडीचे औषधोपचारासाठी रूग्णालयात पाठविले. सदर गुन्हा उघडकीस आणून पीडिता व आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दिलीप पोटभरे, पोउपनि अनुराधा फुकट, पोलीस निरीक्षक विजय राठोड, सपोनि अजीतसिंग देवरे, सपोनि प्राची राजुरकर, सपोनि राजकिरण मडावी, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि विनोद भुरले, पोउपनि रोशन इरपाचे तसेच सायबर व फॉरेन्सिक एक्स्पर्ट पथकाने मोलाची कामगिरी बजाविली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये