Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस खरे देवदूत – आमदार सुभाष धोटें

रक्षाबंधन निमित्य सेवा कलश फाऊंडेशनच्या वतीने राजुरा, गडचांदूर येथे आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सेवा कलश फाऊंडेशन राजुराच्या वतीने गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल व राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून कोरपना, जिवती आणि राजुरा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, अशा सेविका आणि मदतनीस यांचा विशेष सत्कार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.

उपस्थित महिलांनी आ. धोटे याना राखी बांधली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी आ. सुभाष धोटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, अंगणवाडी सेविका, अशा सेविका आणि मदतनीस गावगाड्यात आणि शहरी वस्त्यांत समाजातील अगदी शेवटच्या घटका पर्यंत शासकीय योजना पोहचवून त्या यशस्वी करण्यासाठी जीवतोड परिश्रम घेतात. खऱ्या अर्थाने आपण सर्व देवदूताप्रमाणे गोरगरीब जनतेची सेवा करता व अशा या प्रामाणिक आणि परिश्रमी महिला भगिनींचा सत्कार रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून माझ्या हातून होत आहे हे मी माझे सद्भाग्य समजतो.

आपण सर्वांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून आशा गटप्रवर्तकांना कंत्राटी पदावर समाविष्ट करणे, कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन श्रेणी व बोनस भत्ते मिळणे, वयाच्या ६५ वर्ष झालेल्या सेवानिवृती नंतर ग्रॅज्युविटीची रक्कम तात्काळ देणे इत्यादी मागण्या शासनाकडे लावून धरल्या. अखेर ३८६ सेवानिवृत महिला कर्मचाऱ्याना सेवा निवृतीचा लाभ मिळाला. तसेच सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात आरोग्य खाते आशागटप्रवर्तक फेडरेशन आयटक वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत गट प्रवर्तकांना शासकिय सेवेत कायम करण्यात यावे ही मागणी केली आहे. यापूढेही आपण आपल्या सर्वांच्या सोबत राहून संघर्ष करणार असल्याची ग्वाही सुध्दा त्यांनी दिली.

या प्रसंगी गडचांदूर येथे राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर च्या नगराध्यक्ष सविताताई टेकाम, माजी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक अरुण निमजे, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, महिला काँ. तालुकाध्यक्ष आशाताई खासरे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, सागर ठाकुरवार, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, अभिजीत धोटे, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, डॉ. शेंडे, गणेश जाधव, सीडीपीओ उईके तर राजुरा येथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, सीडीपीओ मेश्राम, एबीडीओ श्रीकांत बोबडे, महिला काँ तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, कविता उपरे, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्शाद शेख यासह परिसरातील अंगणवाडी सेविका, अशा सेविका आणि मदतनीस, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये