Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बदलापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा – बदलापूर येथे चिमुकली मुलीवर अत्याचाराचे प्रकरण पुढे आल्याने महाराष्ट्र मध्ये महिला मुली सुरक्षित आहे? का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच्यावरही आश्चर्यजनक बाब ही आहे की अल्पवयीन मुली वर अत्याचार प्रकरण पुढे आल्यावर सुद्धा 12 तास पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होत नाही कारवाई होत नाही कुठेतरी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होते ही शोकांतिका आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात अनेक महिला अत्याचार व अल्पवयीन मुलीवर शोषणचे प्रकार वाढले असून सरकारची भूमिका या अत्याचार विरोधात स्पष्ट दिसत नाही. कारवाई मध्ये वारंवार दिरंगाईमुळे सदर प्रकरण वाढत चालले आहे आणि महिला सुरक्षेचा दावा सरकारचा कुठेतरी पोकळ ठरत आहे.

यावर आंदोलनाची भूमिका घेत असलेल्या लोकांवर गृह मंत्रालयाच्या आदेशावर लाठी चार्ज होते हेही शोकांतिकाची बाब आहे. वारंवार होत असलेल्या महिलांवर या प्रकारचे अत्याचार व वाढते हल्ले जर आपण बघितले तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी अपयशी ठरत आहे असे दिसून येते. त्यामुळे आमची या निवेदनामार्फत विनंती आहे की तत्काळ चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे व गृहमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे जेणेकरून महिला सुरक्षतेवर कठोर कार्यवाही गृह मंत्रालय मार्फत पारदर्शक पद्धतीने होऊ शकणार.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक भारतीताई कोटमकर, माजी शहर प्रमुख संजयभाऊ पांडे, माजी तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ देवढे, शिवसैनिक मिलन गांधी, शिवसैनिक आसिफ भाई शेख, कुमार हातागळे, माजी सैनिक श्याम भाऊ परसोडकर, भारतीताई थूल,रजनी देहारे, सुनिताताई गायकवाड, भाग्यश्री उराडे, रीनाताई निंबाळे,नेत्रा मांदाडे, पल्लवी अमृतकर, माधुरी खावडे, सविता निखार, शोभा कडू, दुर्गा कचोळे, कल्पना किटकुळे, सविता सहारे, वैशाली अंबादारे, वर्षा किटकुले, अमित भाऊ भोसले, कृष्णा भाऊ शिखरे, शेखर भाऊ इंगोले, रमेश खंगार, संजय भाऊ निंबाळे,शुभम निमजे, जीवन मरस्कोल्हे, इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये