Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

विज पडून युवा शेतकऱ्याचा मृत्यु – राजुरा तालुक्यातील घटना

27 वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यूने गावावर शोककळा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

तालुका मुख्यालयापसून 15 किमी अंतरावर असलेल्या नलफडी येथिल 27 वर्षीय युवा शेतकरी आकाश कालिदास पाकुलवार ह्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी 4:30 वाजता उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार आकाश चार मजुरांसह सकाळीच आपल्या शेतात निलगिरी वृक्षांची लागवड करण्यासाठी गेला होता. दुपारपर्यंत शेतातील काम सुरळीतपणे सुरू होते मात्र दुपारी 4:00 वाजताच्या दरम्यान आकाशात ढग दाटून आल्याने सर्वांनी आपले काम आवरते घेऊन घरी परतण्याचे ठरविले.

अखेरीस दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास घरी परत येत असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला अशातच सर्वांच्या मागाहून येत असणाऱ्या आकाश पाकुलवार ह्याचेवर वाज्रघात झाल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. आकाश पाकुलवार ह्यांच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असुन युवा शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने नलफडी गावात शोककळा पसरली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये