Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे सावन महोत्सवाचे यशस्वी आयोजन – महिलांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्त्रियांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यासाठी असे उपक्रम लाभदायी - अध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

श्रावण महिन्यात निसर्ग हिरवाईचं लेण लेऊन धरणीमाईला जणु हिरवा शालू नेसवत असतो त्यामुळे धरतीचे सौंदर्य कैक पटीने वाढत असते. श्रावण सरी कोसळताच भूमाता तृप्त होते, अरण्यातील मोर आपला सुंदर पिसारा फुलवून नृत्य करतो आसमंत इंद्रधनूने सुंदर चित्रकारी करतो तर महिला त्यातही सासुरवाशीण महिलांच्या हृदयात देखिल हर्षाची तार छेडली जाते कारण श्रावण महिना विविध सण, वृत्तवैकल्य, निसर्गाशी जवळीक निर्माण तर करत असतोच त्याचबरोबर नवविवाहित स्त्रीला माहेरपणाला देखिल नेण्याचे कार्य करतो. एकंदरीतच श्रावण सरी आबालवृद्धांच्या मनात हर्ष निर्माण करीत असतात. म्हणूनच तर बालकवी म्हणतात……..

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;

क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे 

श्रावणाच्या ह्याच आनंदोत्सवात महिलांना सहभागी होता यावे ह्यासाठी जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे शहरात 20 ऑगस्ट रोजी सावन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या महोत्सवाच्या निमित्याने महिलांसाठी विविध वैशिष्ट्यपुर्ण पारंपरिक खेळ तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

सावन महोत्सवाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या सावन क्विन स्पर्धेत जयश्री मंगरुळकर ह्यांनी प्रथम तर प्रीती शर्मा ह्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मॅचींग क्विन स्पर्धेत सपना सारडा ह्यांनी विजय प्राप्त केला.

जेसिआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांनी सचिव मोनिशा पाटणकर, ह्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सावन महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षिका तसेच संगीत तज्ज्ञ अल्का सदावर्ते होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडर प्रेसिडंट जयश्री शेंडे, झेड व्ही पी सुषमा शुक्ला, माजी अध्यक्षा मधुस्मिता पाढी, सुशीला पोरेड्डीवार, झोन ऑफिसर स्मृति व्यवहारे ह्यांचेसह राधा धनपावडे, प्रफुल्ला धोपटे, श्वेता जयस्वाल, स्मिती चौहान, राधा वीरमलवार, नम्रता खोंड, अनुष्का रैच, नम्रता खंनगन श्वेता अपराजित, पूजा घरोटे, वर्षा जैन तसेच ज्योती मेडपल्लीवार यांनी विशेष सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये