Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे हार्डवेअर दुकान चोरांनी फोडले

29,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अमृत नगर देऊळगाव राजा येथील शेख तौसिफ शेख कयुम यांचे हार्डवेयर दुकान 21ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरांनी शटर जवळील पट्टी तोडून दुकानात प्रवेश करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

 सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी यांचे हार्डवेअरच्या दुकानचे शटरचे कुलुपाजवळील लोखंडी पटटी तोडुन आतमध्ये प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानचे काउंटरमधुन नगदी 17000/-रू तसेच अंकुश मोकाटे यांचे नगदी 7000/-रू तसेच लक्षमण भिमराव फुले यांचे अकुंर कंपनीचे होमथेटरबकी अं 5500/-रू असे एकुण नगदी 24000/- रू तसेच होमथेटर 5500/- असा एकुण 29500/- चा मुददेमाल अज्ञात इसमाने चोरून नेला आहे.

अशी रिपोर्ट फिर्यादी ने पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये