Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनु जाती- जमातीचे वर्गीकरण होईल असे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे विरोधात नागभीड बंद आणि मोर्चा काढून निवेदन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट रोजी देशातील अनु जाती- जमाती मध्ये वर्गीकरण करून जाती- जाती मध्ये भेद- भाव करण्याचा प्रयत्न केला असल्याने त्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व समाज संघटनांनी पक्ष बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येऊन बाजार चौक येथून मोर्चाला सुरुवात करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी नाग भीड कडकडीत बंद पाळण्यात आला असून सर्वांनी मिळून मोर्चा यशस्वी करीत तहसिलदार प्रताप वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संपादक रामकृष्ण रामटेके, प्रफुल खापर्डे,अनमोल शेंडे, श्याम रामटेके, आनंद घुटके, निकेश रामटेके, मधुकर दडमल, विजय अमृतकर, मोरेश्वर मडावी, अरविंद सांदेकर, निरजन गजभे, अक्षय उइके, राजगडकर, योगेश गोंनाडे आणि इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये