Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीकरांचा भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 

गोंडवाना गणतंत्र पार्टी व विविध सामाजिक सहयोगी संघटना सहभागी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- देशभरात २१ ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला होता. भारत बंदच्या समर्थांनात जिवती तालुक्यात गोंडवाना गणतंत्र पार्टी व विविध सामाजिक संघटना सहभागी झाली होत्या.एससी व एसटी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता. एससी व एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली होती.एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाचा हा निर्णय धोक्याचा ठरू शकतो. किंबहुना हा निकालच सामाजिक न्यायसंहितेच्या सिद्धांतांविरोधात असल्याचा सूर या संघटनांचा आहे.

भारत बंदच्या समर्थनात जिवतीत गोगपाचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली.यानंतर रॅली काढून तहसीलदारा मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवण्यात आले. युवा नेते गजानन पाटील जुमनाके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बालाजी सोनकांबळे, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, नगरसेवक शामराव गेडाम, माजी सभापती भीमराव मेश्राम, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे लिंगोराव सोयाम, मुळनिवासी एकता संघर्ष समितीचे लक्ष्मण मंगाम, गंगु पा.गेडाम, शंकर वेट्टी, गणपत वेट्टी, जंगु मेश्राम व विविध सहयोगी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

प्रमुख मागण्या :-

आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार संसदेत आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून एका नव्या कायद्याची आखणी करण्यात यावी. या कायद्याला संविधानाच्या नवव्या यादीमध्ये समाविष्ट करत त्याला संरक्षित करून घ्यावं. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करून सदर निर्णय रद्द करावा अशीही संघटनांची मागणी आहे. एससी, एसटी आणि ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना संरक्षण देण्यात याव.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये