ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहलीच्या निमित्ताने सामाजिक एकोपा आणि विविध स्थळना भेटी

चांदा ब्लास्ट

माणूस हा समाजशील प्राणी आहे समाजात वावरत असताना माणसाला सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक,नैतिक आदी गोष्टी प्रामुख्याने पाळावे लागतात त्याच बरोबर जीवनातील अनेक अडचणींना पार करून पुढे जावं लागतं जीवन हे धकाधकीचे झाले आहे,शेतकरी,कामगार,व्यापारी,नोकरी असू ध्या अनेकांचे जीवन कस्टमय झाले यातून मानवी मनाला शांती लाभावी आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी त्यातून प्रेमसंबंध निर्माण होऊन एकोपा चे दर्शन व्हावे या भावनेने टूर चे संचालक श्री जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची सहल नागपूर ते मनाली परत चंदीगड या मार्गे जाऊन आली सहलीत अनेक आमचे जुने मित्र मिळाले खूप आनंद झाला सहलीच्या निमित्ताने अनेक मित्र तयार झाले सोबत राजुरा चंद्रपूर,मुल भद्रावती नागपूर व इतर ठिकाणचे अनेक मान्यवर या सहलीत सहभागी झाले होते खास करून सर्व पन्नास वयाची पार सत्तर च्या जवळपास मान्यवर होती मिळून राहणे मिळून फिरणे मिळून जेवणे मिळून खरेदीसाठी जाणे गप्पा मौज आदि मिळून करणे हे नित्याचे झाले कुठलाही तू मोठा तू लहान आणि कुठली ही गर्विष्ठ पणा नाही सर्व काही आम्ही एकाच परिवारातील एकाच कुटुंबातील आहो असे वाटायला लागले असा योग येणे फार दुर्मिळच असते परंतु हे आमच्या सहलीत घडले सहलीच्या प्रवासात वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आदी कार्यक्रम झाले केक कापले टाळ्यांचा वर्षांव झाला अंताक्षरी झाली गपा झाल्या सर्व आनंदाने आणि प्रेमाने आपुलकीने वागत होते कुणाची तबेत बिगढली की त्यांची आदराने विचारपूस होत होती स्वडिस्ट जेवण नास्ता चहा कॉफी वेळेत मिळत होती आचारी सोबत असलेली भाऊंनी खूप छान तयारी करून आम्हला गरमगरम जेवण मिळत होती फिरण्यासाठी बस असल्याने चालक आणि कंडक्टर यांनी सुंदर सेवा दिली जोशी साहेब आणि सौ जोशी वहिनी प्रामुख्याने लक्ष देताना पाहायला मिळाले अमृतसर मनाली कुलू डलहौसी शिमला चंदीगड व इतर ठिक्काने मनाला आनंद देऊन गेली हा प्रसंग न विसरता येण्यासारखा आहे या प्रवासात कुठेही भांडण व तंटा नाही सीट माझी आहे की तुझी असा प्रसंग घडला नाही या प्रवासात सगळयांनी मिळून मिसळून वागले हेवेदावे विसरले व सर्वांनी एक कुटुंब एक परिवार या सहलीतून दाखवून दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो माणुसकी जिवंत आहे हे दाखवून दिले शेवटी परत येताना गाडीतून उतरल्यावर तुम्ही आमच्या घरी या तुमचे स्वागत आहे परत भेटू हे मनाला आनंद देणारे आहे या निमित्ताने आपण एकमेकांशी जुडलो असेच प्रेम कायम राहू द्या मैत्री जोप्पासु या एकमेकांच्या सुखदुःखात वाटेकरी होऊ या या जीवनावर प्रेम आणि जगण्यावर प्रेम करून परत परत सहलीच्या निमित्ताने भेटू या सहल यशस्वी केल्याबद्दल सहलीतील सर्व मान्यवरांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा

सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार ,गडचांदूर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये