ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वियांश भेले : एका बालप्रतिभेने रचला इतिहास

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, महाराष्ट्र – प्रतिभेला वयाचं बंधन नसतं, हे सिद्ध केलं आहे लिटिल जीनियस प्ले ग्रुप आणि प्री-प्रायमरी स्कूलमधील ३ वर्षीय विद्यार्थी मास्टर वियांश मंगेश भेले याने. अवघ्या तीन वर्षांच्या वयात वियांशने “India is my country” ही राष्ट्रीय प्रतिज्ञा अत्यंत स्पष्ट, आत्मविश्वासपूर्वक आणि प्रभावी पद्धतीने सादर करून सर्वांचं मन जिंकलं.

या अद्वितीय कामगिरीबद्दल इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याला बाल श्रेणीत सन्मानित केलं आहे. इतक्या लहान वयात अशी सादरीकरण क्षमता ही त्याच्या असामान्य कौशल्याची साक्ष देणारी आहे आणि त्याच्या उज्वल भविष्यासाठी एक सकारात्मक संकेतही आहे.

वियांशच्या या यशामध्ये त्याच्या शिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रजिया अकबर शेख यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा मोलाची ठरली. त्यांनी वियांशमधील सुप्त गुण ओळखून त्याला योग्य दिशा दिली.

हा विक्रम १९ मे २०२५ रोजी अधिकृतरीत्या नोंदवण्यात आला. या यशामुळे संपूर्ण शाळा, शिक्षकवर्ग आणि वियांशचा परिवार अभिमानाने भरून गेला आहे, तसेच घुग्घुस परिसरातही आनंदाचे आणि गौरवाचे वातावरण आहे.

वियांश भेलेसारखी बालकं हीच आपल्या देशाचं उज्वल भविष्य आहेत. त्यांनी अगदी लहान वयात मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे सिद्ध केलं आहे की भारताची नवी पिढी गुणी, समर्थ आणि प्रेरणादायी आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये