ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी अभ्यासात आणि सह-शैक्षणिक उपक्रमात संतुलन राखावे – आ. धानोरकर

डोंगरगांव शिक्षण प्रसारक मंडळ, चिकणी येथे स्व. ना. ह. माथनकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

चांदा ब्लास्ट

शालेय जीवनातील विविध स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि सह-शैक्षणिक उपक्रमात संतुलन राखण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
किसान विद्यालय आणि कॉन्व्हेंट, चिकणी येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
डोंगरगांव शिक्षण प्रसारक मंडळ, डोंगरगांव यांच्या संचालीत किसान विद्यालय आणि कॉन्व्हेंट, चिकणी येथे स्व. ना.ह. माथनकर यांच्या १११ व्या जयंती निमित्त चार दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.
आज सकाळी १०.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी डोंगरगांव शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष  रामदासजी नारायणराव माथनकर होते. यावेळी पाहुण्यांचे रूपात शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, आमदार प्रतिभाताई धानोरकर, डोंगरगांव शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष श्रीधरराव काळे, सुभाषराव माथनकर, ज.गो. देठे आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा झाल्या, ज्यात कबड्डी सामने देखील खेळवले गेले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी विविध सांघिक खेळ खेळवले गेले.
शेवटच्या दिवशी समारोप सोहळा पार पडला. यावेळी विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आले. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये