ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगार खेळणाऱ्या आरोपींना सेवाग्राम पोलीसांनी घेतले ताब्यात व 54,730 मुद्देमाल केला जप्त

गुन्हे प्रकटीकरणाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 20/8/2024 रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान सेवाग्राम पोलीसांना गुप्तदारा कडून माहिती मिळाली की सेवाग्राम वार्ड नंबर 2 मध्ये खाली जागेत 52 ताश पत्ते किंमत 50 रुपये डाव सुरू आहे अशी माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे व पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लासुंते पोलिस हवालदार हरिदास काकड विलास लोहकरे नायक पोलिस शिपाई गजानन कठाणे अभय इंगळे यांनी प्रो रेड करुन आरोपी नामे (१) अविनाश नारायण उईके वय ४२ वर्ष राहणार करंजी भोगे तह जिल्हा वर्धा आरोपी नंबर (२) मनिष माधवराव भगत वय ४८ वर्ष राहणार वार्ड नंबर 2 सेवाग्राम जिल्हा वर्धा आरोपी नंबर (३) विनोद ज्ञानेश्वर कांबळे वय ४७ वर्ष राहणार वार्ड नंबर 2 सेवाग्राम जिल्हा वर्धा यांच्यावर पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अपराध क्रमांक ६३८/२४ कलम १२ म.जु.का.दाखल करण्यात आली असून आरोपींच्या ताब्यातून ५२ ताश पत्ते व आरोपी क्रमांक १ जवळून ३७००/-रुपये व त्यांच्या जवळ असलेली एक ॲक्टिवा गाडी क्रमांक एम एच ३२ ऐसी ९५६९ किंमत ५०,०००/- रुपये आरोपी क्रमांक २ यांच्या ताब्यातून नगदी ४८० रुपये जमा करण्यात आले आरोपी क्रमांक ३कडून नगदी ५०० रुपये एकुण आरोपी कडून ५४,७३०/- मुद्देमाल जप्त करण्यात आला हि कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे

यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लासुंते, पोहवा हरिदास काकड, विलास लोहकरे, नापोशी गजानन कठाणे, अभय इंगळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये