महाराष्ट्र

स्थानिक नागरिकच रोजगारापासुन वंचित

सुशिक्षित बेरोजगारांवर वेकोली माजरी एरीया प्रशासनाची तलवार

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :
तालुक्यातील माजरी या गाव क्षेत्रात कोळश्याच्या खानी असुन वेकोली माजरी एरीया मार्फत खानीतील माती काढने, कोळसा काढण्यासाठी खाजगी कंपन्यांना टेंडर कित्येक वर्षापासुन दिला जात आहे. ह्या कंपन्या बाहेर राज्यातुन कामगार बोलवुन त्यांच्या मार्फत अपले काम काढुन घेत आहे. मात्र गावकरी अथवा स्थानिकांच्या हाताला काम नाही. ते बेरोजगार कामासाठी वन वन फिरत आहे. या भागात छोट्या मोठ्या बर्‍याच खाजगी कंपन्या कार्यरत आहे. पण त्यांच्या मार्फत स्थानिकांना रोजगारा पासुन जाणिवपूर्वक वंचीत ठेवण्यात येत आहे, असा आरोप गावकर्‍यांमार्फत केल्या जात आहे. त्यातच काही दिवसापासुन स्थानिक राजकारनी, सामाजीक कार्यकर्ते सयुक्तपने ह्या कंपन्यांकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळविण्यासाठी भेटी घेत आहे मात्र कंपन्यांच्या मालकांना पाझर फुटेल असा तिळमात्र सुद्धा विश्वास उरलेला नाही. बाहेरील राज्यातील कामगारांना काम देऊन स्वराज्यातील स्थानिक सुशिक्षीत, स्किल बेरोजगारांना मात्र डावलन्याच्या रोशाने संयुक्त आंदोलन उभारण्यात आले. मात्र वेकोली प्रशासनाने आंदोलना मुळे वेकोली ला कोळसा उत्पादना मध्ये नुकसान झाल्याच्या आरोपावरुन कार्यकर्ते तसेच बेरोजगारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे गावकर्‍यांमधे, स्थानिक बेरोजगारामधे असंतोष तथा असुरक्षिता निर्माण झाली आहे. कोळसा खानी मुळे माजरी गावातील वातावरण दूषित होऊन पर्यावरणाला हानी पोहचत आहे. तरी सुद्धा पोटापाण्याच्या तथा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कोळसा खानीत काहीतरी काम मिळेल या आशेने येथील जनता वेकोली प्रशासन माजरी एरीया कळे बघत आहे. पण त्याची कुठलिही दखल घेतली जात नसल्याने गावकरी तथा स्थानिक बेरोजगार संतप्त झाला आहे. विशेष म्हणजे वेकोली ने नियम धाब्यावर बसवीनार्‍या कंपन्यांना जाब विचारायचे सोडुन बेरोजगार युवकांचे भविष्य खराब करण्याचे तंत्र हाती घेतले आहे. असे स्थानिक गावकर्‍यांमार्फत सांगण्यात येत आहे व तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये