ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

शेतकऱ्याच्या हस्ते मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

शासकीय हमीभाव अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती,मूल तर्फे रब्बी हंगाम २०२२-२३ मका खरेदीचा शुभारंभ नुकताच मूल येथील शासकीय गोडावून येथे छत्रपती नैताम सिंतळा  येथील शेतकरी यांचे शुभ हस्ते व ईतर शेतकऱ्याचे उपस्थितीत काट्टाचे विधीवत पुजा करून खरेदीचा शुभारंभ करण्यांत आला. संतोष रावत, अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक,चंद्रपूर यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व समितीचे सभापती राकेश रत्नावार व राजेंद्र कन्नमवार, उपसभापती व संचालक मंडळ यांचे उपस्थितीत मका खरेदीचा शुभारंभ करण्यांत आला. त्याप्रसंगी सभापती राकेश या.रत्नावार यांनी शेतकऱ्यांना संबोधीत केले की, दरवर्षी मका खरेदीची नोंदणी करण्यांत येत होती परंतु, शासकीय गोदाम उपलब्ध होत नसल्यामूळे मका खरेदी होत नव्हती. परंतु, यावर्षी शासकीय गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी तहसिलदार यांना विनंती करण्यांत येवून शासकीय गोदाम उपलब्ध करून घेण्यांत आले. मका उत्पादीत शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव दराने मका विक्रीस सुविधा उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे. नोंदणी केलेल्या मका शेतकऱ्यांचा मका खरेदी करणे सुरू करण्यांत आलेले असून समितीने आपल्या मोबाईलवर विक्री करिता कोणत्या दिवशी शेतमाल घेवून यावा याबाबत सुचना देण्यांत येईल त्यादिवशीच आपला मका विक्री करीता आणावा. जेणेकरून वेळीच मका खरेदीची प्रक्रीया होवून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. तसेच, मका विक्री करिता आणीत असताना नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आधारकार्ड सोबत घेवून उपस्थितीत राहावे. जेणेकरून खरेदी केलेल्या मालाची नोंद तात्काळ पोर्टलवर टाकणे शक्य होईल. याव्यतिरिक्त कांही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कार्यालयात तात्काळ सांगावे आपल्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यांत येईल. मका खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार व  अखिल गांगरेड्डीवार, किशोर घडसे, घनश्याम येनुरकर, चंदा कामडी, संदिप कारमवार, अमोल बच्चुवार, तसेच, समितीचे प्रभारी सचिव श्री.अजय क.गंटावार, शासकीय गोदाम चे गोदामपाल व समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये