Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त घेण्यात आली वादविवाद स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी:- दिनांक 20/ 8/ 2024 ला आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी आयसीटीसी विभाग व नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी रेड रिबन क्लब,सांस्कृतिक विभाग,गर्ल्स वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नेवजाबाई हितकरणी महाविद्यालय इथे डॉ.निखिल डोकरीमारे वैद्यकीय अधीक्षक उपजील्हा रुग्णालयलय ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी इथे तालुकास्तरीय “महाविद्यालयात लैंगिक शिक्षण देणे योग्य की अयोग्य” या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राजक्ता फुलझेले समुपदेशक उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी .एच .गहाणे (प्राचार्य नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी) यांनी व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली समलैंगिक संबंध, बलात्कार ,एचआयव्ही एड्स इत्यादी प्रकारचा सौराचार कशाप्रकारे वाढत चालला आहे यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते म्हणून डॉ. निखिल डोकरीमारे (वैद्यकीय अधीक्षक उपजील्हा रुग्णालय ब्रह्मपुरी) यांनी आपले मार्गदर्शनातून मुला-मुली मधील लैंगिक ते सबंधितत विचार विवेकपूर्ण बनवण्याकरिता पालक, शाळा ,महाविद्यालये आणि वैद्यकीय संस्था यानच्याकडून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप आवश्यक आहे हे पटवून दिले या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्रीकांत कांबळी यांनी लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत समाजात असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे हे सांगितले या स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक महाविद्यालयानि भाग घेतला व विद्यार्थ्यांनी लैंगिक शिक्षणाविषयक आपले मत व्यक्त केले या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी सुषमा दोडकुजि ढुसे शांताबाई भैय्या महिला महाविद्यालय यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक धनुश्रति गोपाल सुरपाम नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी तर तिसरा क्रमांक तेजस्विनी जयदेव गरडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी यांनी पटकावला स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना उपजील्हा रुग्णालय ब्रह्मपुरी तर्फे स्मृतिचिन्ह , रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन डॉ.कुलजित कौर गिल यांनी केले व सूत्रसंचालन डॉ. अजित व्ही. खाजगीवाले तर आभार प्रदर्शन डॉ.पद्माकर वानखेडे सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी केले या स्पर्धेचे परीक्षक डॉ. निखिल डोकरीमारे, डॉ.श्रीकांत कामडी यांनी केले . या कार्यक्रमाला डॉ. धनराज खोनारकर , डॉ. नागभीडकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये