Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परंपरागत खेळ संस्कृती जपणारी पठाणपूरा व्यायामशाळा सर्व सोयी-सुविधांनी युक्त बनविणार – आ. किशोर जोरगेवार

पठाणपूरा व्यायामशाळेच्या विकासासाठी 1 कोटी रुपयांचा निधी, कामाचे भूमिपूजन संपन्न

 चांदा ब्लास्ट

पठाणपूरा व्यायामशाळा ही अतिशय जुनी आहे. अनेकांनी येथे परिश्रम घेतले आहेत. त्याचेच फळ म्हणजे येथून निघालेले खेळाडू राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत. क्रीडाप्रेमी हा परिसर आहे. आपण या व्यायामशाळेच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. येथे पैसे कमी पडू देणार नाही. परंपरागत खेळ संस्कृती जपणाऱ्या या व्यायामशाळेला सर्व सोयी-सुविधांनी युक्त बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी पठाणपूरा व्यायामशाळेच्या वि

कासकामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक नंदू नागरकर, विजय चहारे, माजी नगर सेविका खशबु चौधरी, अरविंद चहारे, माजी नगर सेवक प्रशांत दानव, बबन चहारे, श्रीकांत चहारे, सुधाकर बुटले, रमेश चहारे, बाळु कातकर, रमेश भुते, धन्ना येरेवार, प्रदिपपुगलिया, श्रीहरी पुगलिया, रुपेश चहारे, कुणाल चहारे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंढारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, 1 कोटी रुपयांतून पठाणपूरा येथे तयार होणारी ही व्यायामशाळा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा केंद्रबिंदू नसेल, तर ती आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवनशैलीकडे मार्गदर्शन करणारी असेल. चंद्रपूरात अनेक विकासात्मक गोष्टी करण्याचा संकल्प आपण केला होता. त्यातून अनेक विकासकामे मार्गी लावता आली, याचा आनंद आहे. आपण विशेषतः अभ्यासिका, व्यायामशाळा आणि समाजभवन बांधण्यावर अधिक भर दिला. या तीन गोष्टीतून मानवाचा संपूर्ण विकास होऊ शकतो, असा आपला समज आहे. आज अनेक खाजगी व्यायामशाळा चंद्रपूरात उभ्या आहेत. असे असताना पठाणपूरा व्यायामशाळेने आपली छाप कायम ठेवली आहे. येथून अनेक बॉडीबिल्डर तयार झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शारीरिक आरोग्याचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तंदुरुस्ती केवळ शरीरासाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. आपले जीवन अधिक सक्रिय, निरोगी, आणि आनंददायी बनविण्यासाठी व्यायामाचे महत्त्व मोठे आहे. येथे तयार होणाऱ्या या व्यायामशाळेत विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असणार आहे. यातून युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची सवय निर्माण होईल, असे ते बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

भव्य मिरवणूक काढत पठाणपूरा व्यायामशाळेच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत

भूमिपूजन सोहळ्यासाठी पोहोचलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांची भव्य मिरवणूक व्यायामशाळेच्या वतीने काढण्यात आली. जोळ देऊळ चौक येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. यात लेझीम पथक आणि परंपरागत खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी पठाणपूरा व्यायामशाळेचे पदाधिकारी आणि वॉर्डवासीयांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये