Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लबचा जिल्हा कारागृहात देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम

स्वातंत्र्य दिनी बंदी बांधवांचे देशभक्तीमय वातावरणात मनोरंजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग १ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी जिल्हा कारागृहात देशभक्तीपर गित गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशभक्तीपर गीत सादर करून बंदी बांधव व बंदी भगिनींना मंत्रमुग्ध करण्यात आले. एकप्रकारे देशभक्तीची वातावरण निर्मिती झाली.

जिल्हा कारागृहातील सभागृहात सकाळी ९.३० वाजता या देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केले. मंचावर रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष अजय पालारपवार, सचिव मिलिंद बोडखे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी के.बी. मिराशे, सतीश सोनवने, नागेश कांबळे, प्रोजेक्ट डायरेक्टर मनीषा पडगेलवार, कारागृह शिक्षक हटवादे, रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण तिखे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘जयो स्तुते जयो स्तुते ‘ या मनीषा पडगेलवार व सहकाऱ्यांच्या देशभक्तीपर समूह गीताने झाली. त्यानंतर अजय पालारपवार यांनी जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वह भारत देश है मेरा हे गीत सादर केले.

वरिष्ठ तुरुंग अधिकारी के.बी. मिरसे यांनी है प्रीत जहा की रीत सदा, भारत का रहने वाला हु, भारत की बात सूनाता हु तथा मै हुं देश प्रेमी हे गीत सादर करून मंत्रमुग्ध केले. वैशाली रेशीमवाले हिने तेरी मिट्टी मे…हे केसरी चित्रपटातील देशभक्तीपर गीत सादर केले. तर मनीषा पडगेलवार हिने हम जियेंगे ओर मरेंगे ये वतन तेरे लिये, जिंदगी हर कदम एक नयी जंग है हे गीत सादर करून वातावरण निर्मिती केली. कारागृह शिपाई संदीप जोशी यांनी मैं हुं डॉन हे गीत उत्साहात सादर करून वातावरणात जोश भरला.

यावेळी बंदी बांधवांनी देखील कविता, प्रार्थना व देशाभातीची गीते सादर केली. वेडात मराठे वीर दौडले सात, रहे ना रहे हम या समूह गितासोबत मनीषा पडगेलवार यांच्या ए मेरे वतन के लोगो या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम विशेषकरुन कारागृहातील बंदी बांधवांकरीता त्यांच्या मनातील बंदिस्थ भावनांना वाट मोकळी करून देण्याकरीता व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याकरीता विशेषत्वाने आयोजीत केला होता.

या कार्यक्रमात रोटरीचे संतोष तेलंग, राहूल खटोड,अतुल भिसे, डॉ सरबेरे, अरुण तिखे, डॉ पालीवाल, वंदना तिखे, नंदाताई अल्लुरवार ,शितल गौरकार, अर्चना पालारपवार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता कारागृह अधिक्षक अनुपकुमार कूमरे तसेच कारागृहाचे इतर अधिकारी वर्गानी भरपूर सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटरीचे सचिव मिलींद बोडखे यांनी केले. कार्यक्रम आतिशय हासत खेळत व आनंदी वातावरणात पार पडला असे सचिव मिलींद बोडखे कळवितात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये