पुरोगामी महिला मंच भद्रावती द्वारा महिला मेळाव्याचे आयोजन
नेत्र तपासणी शिबिर तथा सत्कार सोहळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
विद्यार्थ्यांना शिकवितांना महिला शिक्षिकांना वेगवेगळी भूमिका पार पाडावी लागत असते. घर व शाळा सांभाळून आपल्या कलागुणांची जोपासना करून त्यांची प्रगटीकरण करण्याची संधी क्वचितच त्यांना मिळत असते, हा धागा पकडून पुरोगामी महिला मंच भद्रावती द्वारा आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती भद्रावती येथील खास महिलांनी महिलांसाठी तालुकास्तरीय महिला मेळावा,नेत्र तपासणी शिबिर तथा सत्कार सोहळा नुकताच नेताजी नगर सभागृह, भद्रावती येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उज्वलाताई ठेंगणे,प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रिती उराडे, डॉ.अलकाताई ठाकरे, शालिनी खटी,पोर्णिमा मेहरकुरे,माधुरीताई निंबाळकर, कविताताई हनवते, भारतीताई लखमापूरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
पहिल्या सत्राची सुरुवात चिमुकल्या मुलींच्या स्वागत नृत्य व प्रेरणा गीताने झाली. पुरोगामी परिवाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका भावना गुंडमवार,वर्षा पारोधे, सुनंदा काकडे यांचा सत्कार रोपटे,स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.तसेचअमृता जिवने (शिक्षण), सुप्रिया कोडापे (खेळ), मिनाक्षी बल्की, सिंधू राठोड संचालिका यांचा विशेष कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच पंचायत समिती भद्रावती येथील बारा केंद्रातील उपक्रमशील शिक्षिका रूपाली बरवड, अर्चना गरमडे, शारदा गुरले, रिता पाम्पटीवार,वनिता जुमडे,संध्या कुबडे, अर्चना कुंभारे, हर्षदा शेंडे, माधुरी चिंचोलकर,नाजीया कुरेशी, वंदना कुबडे, श्रद्धा लखोटे यांचा गौरव सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष अतिथी डॉ.प्रिती उराडे यांनी आपल्या डोळ्यांची निगा कशी राखावी,कोणता आहार घ्यावा याबद्दल माहिती दिली तसेच अलकाताई ठाकरे यांनी पुरोगामी महिलाची मंचाची वाटचाल, कार्य कसे व्हावे यावर मार्गदर्शन केले.
यावेळी वैयक्तिक नृत्य ,चालता बोलता प्रश्न मंजुषा,निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर इत्यादी दर्जेदार व भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन महिला मंच अध्यक्षा भारती लखमापुरे, सूत्रसंचालन वैशालीताई देशमुख व आभारप्रदर्शन सिंधूताई राठोड यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुप्रिया कोडापे,वैशाली देशमुख,मीनाक्षी बलकी, सविता नागोसे,भावना गुंडमवार, अमृता जीवने, वैशाली वडेट्टीवार,कविता कोडापे,माधुरी चिंचोलकर, कविता ताई होते, माधुरी गिरडकर,चंदा दातारकर, वंदना चौधरी, ज्योती नगराळे,वंदना कुबडे,जयश्री कांबळे ,संध्या कुबडे,अर्चना धकाते,अर्चना गरमडे ,शारदा गुरले, वंदना जुमडे तसेच आमचे बंधु राजु चौधरी, गणेश दुधलकर, जगदीश ठाकरे, गंगाधर बोढे आदींनी अथक परिश्रम घेतले.