देऊळगावराजा येथे “एक तास राष्ट्रवादीसाठी,महाराष्ट्राच्या विकासासाठी” उपक्रम राबविला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तालुक्यातील व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विविध विषयांवर विचार-विनिमय केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवार ला ” एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी ” हा उपक्रम घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आज देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सदर उपक्रम राबविला.
यावेळी तालुक्यामध्ये पक्ष संघटन अजून मजबूत करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात पक्षाला विक्रमी मताधिक्य मिळून देण्याचा निश्चय सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. शेतकरीकर्ज माफी, दिवसेंदिवस वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटना याबाबत आगामी काळात पक्षाच्या वतीने करण्यात येणारे आंदोलने तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तुकाराम खांडेभराड, आलम खान कोटकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ कोल्हे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे, एल. एम. शिंगणे,महिला काँग्रेसच्या सरस्वती टेकाळे, राजीव शिरसाट, गणेश बुरकुल, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, युवक शहर अध्यक्ष अभिनव खांडेभराड, बाळू शिंगणे, करीम भाई,रफिक भाई, इस्माईल बागवान, साजिब कोटकर, मंगल अंभोरे, संजय लोखंडे आदींची उपस्थिती होती.