ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवाजी महाराज हायस्कूल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा येथे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर 28 फेब्रुवारी रोजी झाले.

ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा व छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर प्रशांत देशमुख दंत चिकित्सक , डॉक्टर ज्योत्स्ना जमधडे वैद्यकीय अधिकारी , डॉक्टर सचिन देवकर वैद्यकीय अधिकारी, श्रीमती वनिता खरात ए .एन . एम . यांनी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.

याप्रसंगी प्राचार्य एस के देशमुख, पर्यवेक्षक व्हीं एल आव्हाने, आर व्हि सपाटे, संजय मगर, दयाशंकर वैद्य, दोपक सावळे, विजय मारोडकर, दांडगे मॅडम, नौशाद खान तथा इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये