Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बम बम भोलेच्या गजरात शहरात भव्य कावड यात्रा निघाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्रावणी सोमवार निमित्त दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ते २ वाजे दरम्यान देऊळगाव राजा शहरामध्ये बम बम भोलेच्या गजरात भव्य कावड यात्रा निघाली . कावड यात्रेमध्ये महादेवाचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .बम बम भोले च्या गजरामध्ये श्री बालाजी नगरी दुमदुमली

    श्रावणी सोमवार निमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले .शहरातील आमना नदीचे संगम येथील मेळाचा महादेव मंदिर सावखेड रोड येथून कावड यात्रेस प्रारंभ झाले .महादेवाची पिंड -नंदी आणि महादेवाची मूर्ती असे कावड यात्रेचे स्वरूप होते . आमना नदीच्या संगम येथून कावड मध्ये कलशात पाणी घेऊन मोठ्या संख्येत भक्तगण आपल्या खांद्यावर कावड घेऊन . शहरातील मुख्य मार्गावरून निघाले .कावड यात्रेच्या मार्गावरील बागेतील महादेव, धुंडीराज महाराज मठ,, दत्त उपासना धाम , चतुर्शिंगी देवी , श्रीराम मंदीर,मयुरेश्वर गणपती व महादेव मंदिर, फरसा वरील महादेव व गणपती मंदिर, शनी मंदिर, दुर्गामाता मंदिर, श्री संतोषी माता मंदीर , श्री चौंडेश्वरी देवी , हनुमान मंदिर – इत्यादी मंदिरासमोरून कावड भक्त यांनी कावड यात्रा मार्गक्रमन केली.

      ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिर येथे कावड भक्तांनी बम बम भोले चे नारे लावले .श्री बालाजी संस्थान च्या वतीने कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले .शहरातील महिलांनी जागोजागी रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करून कावड यात्रेचे स्वागत केले.

   श्री पंचानन खोरेश्वर महादेव मंदिर येथे समस्त महादेव भक्त यांनी आमना नदीच्या संगम येथून आणलेल्या कलशातील जलाने महादेवाचे अभिषेक केले व पूजन केले महाआरतीने कावड यात्रेची सांगता झाली . या कावड यात्रेचे आयोजन सकल हिंदू समाज व भोले भक्त यांनी केले होते

    बम बम भोले च्या गजरामध्ये श्री बालाजी नगरी दुमदुमून गेली.

 राजकीय सामाजिक आध्यात्मिक व प्रशासन क्षेत्रातीलमान्यवरांनी जागोजागी कावड यात्रेकरूंचे स्वागत केले .आले का ठिकाणी बोली भक्तांनी चहापाणी ची व्यवस्था केली होती.

     कावड यात्रेत पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख ठेवण्यात आला होता

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये