Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंदिरा गांधी गार्डन शाळेत विद्यार्थी परिषद पदग्रहण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

चंद्रपूर: इंदिरा गांधी गार्डन शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण वाढवण्यासाठी अलीकडेच विद्यार्थी परिषदाचा(कॅबिनेट कौन्सिल) पदग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे हेड बॉय आणि हेड गर्ल, वेगवेगळे हाऊस आणि क्लबचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन असे एकूण २२ कॅबिनेट कौन्सिल सदस्यांनी शपथ घेतली.

या समारंभाचे अध्यक्षा प्राचार्या सीमा जोसेफ , तर मुख्य अतिथी म्हणून एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीचे सचिव कृष्णन नायर आणि एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामदास वाग्दरकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या सीमा जोसेफ यांनी हेड बॉय तनमय बारसगडे आणि हेड गर्ल शर्वरी महाजन यांच्या शपथ विधी ने झाली. या प्रतिज्ञेनंतर मुख्य अतिथींनी शाळेचा ध्वज प्रदान केला आणि नव-नियुक्त नेत्यांना बॅज लावून त्यांच्या पदांची जबाबदारी दिली.

कार्यक्रमात कॅप्टन आणि उप-कॅप्टन यांची शपथही घेतल्या गेली. स्पोर्ट्स क्लबची जबाबदारी आदित्यवर्धन अहिर आणि वेदांत होकम यांना देण्यात आली, तर सांस्कृतिक क्लबचे नेतृत्व जान्हवी कोवे आणि श्रावणी विहिरघरे यांना दिल्या गेले. लिटरेरी क्लबची कमान अर्णवी वैद्य आणि गौरी कडेल यांच्याकडे आली, तर मैथ्स क्लबचे नेतृत्व अनुराग अंबाडे आणि वेदिका चाटे यांना सोपविण्यात आले. सायन्स क्लबचे नेतृत्व श्रुष्टि एलटीवार आणि दर्श खसरे यांना दिले गेले, आणि युथ क्लबची जबाबदारी निर्मिति लुलु आणि शौर्य ससनकर यांना सोपविण्यात आली. प्राचार्या सीमा जोसेफ यांनी त्यांच्या कडून घेतल्या आणि मुख्य अतिथींनी कडून क्लबच्या नेत्यांना बॅजेस आणि सॅशेस देण्यातआल्या.

शाळेच्या हाऊस कॅप्टन आणि उप-कॅप्टन यांनी देखील या प्रसंगी आपली शपथ घेतली. भूषण देवगडे आणि नमस्वी सुपहा यांना विंटर हाऊसचे नेतृत्व देण्यात आले, युवराज सिंह आणि अवनी शेंडे यांना ऑटम हाऊसचे, खुशी पेकडे आणि कुणाल लॉनगाडगे यांना समर हाऊसचे, आणि संस्कृती दांडेकर आणि अंकित सिंह यांना स्प्रिंग हाऊसचे नेतृत्व सोपविण्यात आले.

मुख्य अतिथी कृष्णन नायर यांनी नव-शपथ घेतलेल्या कॅबिनेट कौन्सिलचे अभिनंदन केले, आणि शाळेच्या परंपरा आणि मूल्ये जपण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना उदाहरण बनून नेतृत्व करण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी आणि शाळेसाठी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

सहायक शिक्षिका श्रद्धा एडलावर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर हेड गर्ल शर्वरी महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. शिक्षकांमध्ये रेश्मा पठाण, विशाल चव्हाण आणि सिद्धांत चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी खूप मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये