ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माजी मुख्यमंत्री मा.श्री.वसंतराव नाईक यांची जयंती तहसील कार्यालय वर्धा येथे साजरी
संदिप पुंडेकर तहसीलदार वर्धा यांनी केले अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी तहसील कार्यालय वर्धा येथे माजी मुख्यमंत्री मा.श्री. वसंतराव नाईक यांची जयंती वर्धा तहसील कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी वर्धा तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री.संदिप पुंडेकर यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री.क्षिरसागर नायब तहसीलदार श्री.संदिप दाबेराव नायब तहसीलदार श्री.अजय धर्माधिकारी नितीन मेश्राम अनंत
राऊत संजय मनवर व इतर वर्धा तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.