Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

वर्षावास प्रवचन मालिका समारोपीय कार्यक्रम संपन्न

शहरातील विविध बौद्ध विहारामध्ये वर्षावास प्रवचनाचे केले होते आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे. तथागत बुद्धाने त्या वेळी आपल्या जिवनातील ४५ वर्षे वर्षावासात उपस्थिति दर्शविली. पावसाळ्या दरम्यान सर्व भिक्खु एके ठिकाणी उपस्थित राहुन वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेत असतात. जनतेकडुन आलेले प्रश्न, स्वतःच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, धम्माला भविष्यात अधिक गतीमान करण्याकरीता नियोजन, चिंतन आणि मंथन वर्षावासाच्या दरम्यान करण्याची परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळेच बौद्ध धम्म संपुर्ण एशिया सोबतच जगभर प्रस्थापित झाला.

अशी उच्च कोटि ची परंपरा तथा वर्तमान आणि भविष्याचे वास्तव पाहता समता सैनिक दल मागील अनेक वर्षापासुन सातत्याने ‘वर्षावास प्रवचन मालिके’ च्या अंतर्गत महत्वपूर्ण विषयावर आयोजन करत आलेला आहे. दर वर्षी प्रमाणे या वर्षी २०२३ मध्ये सुद्धा ‘वर्षावास प्रवचन मालिके’ चे आयोजन ससैदला च्या विविध शाखां मध्ये केल्या गेले. जुलै महिन्याच्या आषाढ़ पूर्णिमा पासुन सुरू आहे. अश्विन पूर्णिमे पर्यंत चालविल्या गेले तसेही बौद्ध धम्मा मध्ये प्रत्येक पुर्णिमेचं महत्वपूर्ण स्थान आहे .हि वर्षवास मालीका भद्रावती येथील आयुध निर्माणी चांदा भद्रावती, वेळुवन बुद्धविहार सुमठाना, नासगसेन नगर बुद्ध विहार, लिंबुनी नगर बुद्ध विहार भद्रावती तसेच देशभरातील समता सैनिक दला च्या विविध शाखा मधे एकाच वेळेत घेण्यात आली.

ह्या पुर्ण वर्षावास प्रवचन मालिके चे समारोपीय कार्यक्रम ससैदल शाखा भद्रावती येथे मार्शल अविनाश दिग्विजय ह्यांच्या निवास स्थानीं प्रांगणात आयोजित गेल्या गेले ।सोबतच शास्वत अविनाश दिग्विजय ह्यांच्या वाढदिवस ह्या निमित्ताने साजरा करन्यात आला.ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मार्शल सुनील सारिपुत्त सर, केंद्रीय संघटक ससैदल हे उपस्थित होते मुख्य अतिथि म्हणुन मा.मार्शल ॲड. प्रकाश दार्शनिक सर राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख ससैदल तथा मा.मार्शल किशोर चहांदे सर, राष्ट्रीय प्रचारक, ससैदल होते. सोबतच ससैदल महिला विंग च्या मा.कांचनताई वासनिक मॅडम, मा.शितलताई सारिपुत्त मॅडम, मा.मयुरी कदम मॅडम, ससैदल महाराष्ट्र राज्याचे नियंत्रक नरेश ताकसांडे सर, ससैदल आंध्रप्रदेश संघटक रोहनबोधी कदम सर, मा.जगदिश पाटिल सर, मा.नवनाथ नगराले सर, ईश्वर चिकाटे सर, मा. हर्शल रामटेके सर इत्यादी पदाधिकारिंनी उपस्थिति दर्शविली.

सन्माननीय पदाधीकार्‍यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केल्या गेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांनी ‘चलो चलें डॉ बाबासाहब आंबेडकर द्वारा निर्देशित बौद्ध धम्म की ओर’ ह्या मौलीक विषयावर आपले मार्गदर्शन केले. तथा सपुर्ण आयोजन चे आभार प्रदर्शन मार्शल नरेश ताकसांडे सर यांनी केले. वर्षावास प्रवचन मालिकेच्या समापन समारोहानंतर भोजनाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रम समाप्त केल्या गेला. ह्या कार्यक्रम च्या यशस्वीते साठी मा. मणिकुमार जाधव, संदीप तायडे, संदीप वानखेड़े, गणेश शिरुड, अमर पळवेकर, चंदन पळवेकर, विजय लभाने, विजय बडोले, कमलाकर काटकर, हर्शल रामटेके, राहुल रामटेके, देवानंद धोंगडे, अमोल दवाडे, धीरज मजगवळी, विशाल चंदनकर, निलेश भैसारे, अशोक पाझारे, नरेंद्र भगत, प्रदिप रामटेके, रुपेश पाटील, अमन पाटील, संबोधी दिग्विजय, तक्षशिला पळवेकर, वृषभ दवाडे, सचिन गवई, गजानन मेश्राम, हर्शल वावरे, पंकज पाटील, रुपा दिग्विजय, पुजा पाटील, अद्विक नंदेश्वर,रितेश चिकाटे इत्यादीं ने परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये