Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.पल्लवी टिपले विदर्भ कन्येची राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग झेप!

आरोग्य क्षेत्रातील उच्चशिक्षित २५ युवतींचा समावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्वप्न उंच भरारीचे आकाश कवेत घेण्याचे स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे मातृत्व देण्याचे” नन्ही सी किंकारी “आई-वडिलांना घरपण देऊन आनंददायी वातावरण निर्माण करते ,सुखी संसाराचे उज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना सूर्यप्रकाशासारखे एक आशेचे किरण निर्माण करित नवीन उमेद निर्माण करून स्वप्न सत्यात उतरवते हे कार्य घडते आहे.

महाराष्ट्रातील मराठी भाषेवर व वाणीवर प्रचंड प्रभुत्व असलेल्या विदर्भातील मातीशी नाळ जुळवून असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील वर्धा जिल्ह्यातील डॉ.पल्लवी टिपले यांच्या माध्यमातून सहकारी चंद्रपूर, वर्धा, सोलापूर,गुजरात,नगर,सांगली,बीड,रायगड, औरंगाबाद, पुणे, संबंधित क्षेत्रातील उच्च शिक्षित तज्ञ युवतींना सोबत घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत डॉ. पल्लवी टिपले ही विदर्भ कन्या फेमकेअर फर्टिलिटी, बाणेर पुणे परिसरात हॉस्पिटलच्या प्रमुख म्हणून मिळून साऱ्याजणी ब्रीदवाक्य घेऊन सातत्याने जबाबदारी सांभाळते आहे.

डॉ.पल्लवी टिपले इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट व ग्याँनिकोलॉजिस्ट ,एमबीबीएस, एमडी,FRM, DGO. आरोग्य क्षेत्रातील उच्च शिक्षा विभूषित असून, महाराष्ट्रातील विदर्भात वर्धा जिल्ह्यातील सालोड (हिरापूर) ग्रामीण विभागातील पहिल्या महिला डॉ.आहेत. महाराष्ट्र बरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फेमकेअर फर्टिलिटी ‘माध्यमातून आपल्या आरोग्यदायी कर्तव्यावर राहून आपुलकी व जिव्हाळ्याने पेशंट हातळणाऱ्या अगदी कमी 33 वर्षीय यंग लेडी डॉक्टर असून आरोग्य क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या यु़वतींनसाठी आयडियल प्रेरणादायी आहे .त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील चाललेल्या कार्याला विविध स्तरावर यश प्राप्त झाल्याने महाराष्ट्र,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्यदायी गुणगौरव व सन्मानास प्राप्त असून त्यांच्या कार्याबद्दल विविध आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनात डाँ. श्वेता कुलकर्णी सहाय्यक बी. ए. एम. एस, सोलापूर, डॉ. हिरल जाधव बी. एच.एम. एस, गुजरात सध्या पुण्यात, सुदर्शन काळे मुख्य एम्ब्रोईओलॉजिस्ट एम.एस. सी. एम्ब्रोलाजी पीएचडी, औरंगाबाद, सोनाली कचरे ए. एन. एम, नगर, मोनिका भालेकर बेसिक नर्सिंग, सांगली, रूपाली आसुळ औषध निर्माता डी फार्म बीड, आरती पवार फ्लोर मॅनेजर, एमआरडी कोऑर्डिनेटर एम एस सी लाइफ सायन्स ,रायगड, प्रतिमा गोरडे टेली कॉलिंग टीम नगर, रेवती ठोसर टेली कॉलिंग टीम,बीड, वंदना थोरात, अलमास शेख पुणे काम पाहत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांनी विदर्भ कन्या डॉ.पल्लवी टिपले यांची पुण्यात भेट घेऊन संवाद साधत विशेषतः चंद्रपूर- गडचिरोली सह इतर जिल्ह्यात कॉलेज महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शना करिता “आरोग्य मंथन” या कार्यक्रमात पाचारण केले असून यात अनेक तज्ञ डॉक्टरांचा समावेश राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये