Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशवंत महाविद्यालय विधी शाखा येथे भव्य सायबर जनजागृती कार्यशाळा

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आजच्या बदलत्या व शिघ्रगतीने प्रगत होणा-या यूगात विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षक म्हणून लक्ष ठेवणे जिकरीचे झाले आहे तसेच पौगंडावस्थेतील मुलांचे गुन्हेगारी मार्गांनी जाण्याचे व नकळत कायद्याचे चौकटीत न बसणारी कामे श्रील म्हणून करून पाहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच सामान्य नागरीक हे विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थीक गुन्हयांना बळी पडत आहेत. यावर प्रभावी उपाय म्हणून मा. पोलीस अधिक्षक सा. वर्धा श्री. नुरुल हसन यांचे मार्गदर्शनात व सायबर पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्री. महेश चव्हाण यांचे निर्देशाप्रमाणे वर्धा जिल्हा पोलीसांतर्फे सायबर जनजागृती अभियान राबविण्यात येत असून त्यांतर्गत शाळा-कॉलेज, औद्योगीक संस्था येथे कार्यशाळा, पत्रके वाटप असे बरेच उपक्रम राबविण्यात येत आहे.

याच मोहिमेचा 1 भाग म्हणून आज दिनांक 10.08.2024 रोजी वर्धा शहरातील यशवंत महाविद्यालय, वर्धा येथील विधी शाखेचे विद्यार्थी व शिक्षक यांचेकरीता सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमामध्ये सायबर सेल, वर्धा तर्फे पो.हवा. कुलदीप टांकसाळे व पो.हवा. निलेश कट्टोजवार यांनी इंन्स्टाग्राम, फेसबूक, व्हॉट्सअॅप व इतर सोशल मिडीयाचे हॅकिंग / डयूप्लीकेशन पासून वाचण्याचे उपाय व त्यांचा गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वतःला सुरक्षीत ठेवण्याच्या उपायांची माहिती दिली. ऑनलाईन बँकीग व्यवहारातील फसवणूक, यु.पी.आय. फ्रॉड, ईलेक्ट्रीसीट बिल फॉड, टास्क फ्रॉड, कस्टमर केयर फ्रॉड यासारखे नवनवीन फसवणूकीचे प्रकार व त्यापासून बचावाकरीता उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये अत्याधूनिक आर्टीफीशील इंटलीजंस व मशीन लर्नंग यांचा सुध्दा सहभाग करण्यात आला. त्यासोबतच शासनातर्फे हरविलेले मोबाईल शोध व ऑनलाईन फसवणूक थांबविण्याकरीता सुरू करण्यात आलेले सी.ई.आय.आर. पोर्टल व एन.सी.सी.आर.पी. पोर्टल यांचे संबंधाने माहती देण्यात आली. तसेच सदरची माहिती आपले पालक, नातेवाईक व मित्रपरीवार यांचेमध्ये प्रसारीत करून त्यांना सुध्दा सतर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

यशवंत महाविद्यालय, विधी शाखा येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सदर कार्यशाळेदरम्यान दिलेल्या माहितीला व कार्यशाळेनंतर विचारलेल्या प्रश्नांमधून उस्फूर्त प्रतिसाद दिला असून संपूर्ण माहिती आत्मसात केली आहे. सदर कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य गिरीश ठाकरे, विधी विभागाच्या एच.ओ.डी. डॉ. शिप्रा सिंघम, वकील श्री. ढगे, चांडक, मोहता, बेंडळे व 110 विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये