Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना पोलीस स्टेशनने केली गोमासवर मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा पोलीस स्टेशन यांना गुप्त माहितीनुसार 5 ऑगस्ट रोजी मौजा खातेरा पारडी गावाकडून आदीलाबाद कडे कत्तली करिता पिकप इंट्रा वाहन क्रमांक एम एच 29 बी इ 6839 या वाहनांमध्ये जनावरांना निर्दयतेने कोंडून एकमेकांना दोरीने गळ्याजवळ व तोंडाला घट्ट बांधून कसली करिता घेऊन जात आहे.

अशा खात्रीशीर खबरे वरूनम मौजा पारडी गावाबाहेरील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचून रोडवर नाकाबंदी करीत असताना मौजा खातेरा गावाकडून पारडीकडे पिकप इंट्रा वाहन येताना दिसल्याने त्यावर संशय असल्याने त्याच आम्ही रात्री 1च्या दरम्यान बॅटरीच्या साह्याने थांबवण्याचा इशारा केला असता सदर पिकप चालकाने सदरचे वाहन रोडच्या बाजूला थांबवले असता त्या ठिकाणी जनावरे दिसून आले त्या ठिकाणी असलेले जनावरे कोरपणा पोलीस स्टेशन आणण्यात आले व कारवाई करण्यात आली.

पिकप जनावरे व मोबाईल एकूण किंमत4,61,000/रू चा माल जप्त करण्यात आला सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का, पोलीस उपअधीक्षक जणबांधु मॅडम SDPO जाधव यांच्या मार्गदर्शना खाली ठाणेदार गायकवाड यांचे आदेशाने पोहवा सिडाम,पोशी गणेश वाद्य,पोशी बिबीशन खटके,चालक पोशी विक्रम दासरवार यांनी कारवाई केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये