Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीच्या वतीने वर्धा विधानसभेची उमेदवारी मला देण्यात यावी !

चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा यांच्याकडे सुरेश पट्टेवार यांची निवेदनाद्वारे मागणी!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- भारतीय जनता पक्षाची वर्धा विधानसभेची उमेदवारी मिळण्याबाबत 2019 च्या निवडणुकी दरम्यान बरेच प्रयत्न केल्यानंतरही उमेदवारी मिळाली नाही त्यादरम्यान ठाणे येथील भाजपचे आमदार संजयजी केळकर यांनी वर्धा येथील शासकीय विश्राम गृहात माझा इंटरव्यू घेतला असता मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती त्यानंतर नागपूर येथील मीटिंग दरम्यान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी जे. पी. नड्डा यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट सांगितले की वर्धा विधानसभेची तिकीट सीट एक आहे परंतु उमेदवारी मागणारे दहा आहेत त्यामुळे ज्या कोलाही एका उमेदवाराला तिकीट मिळाले त्याच्या पाठीशी इतर सर्व उमेदवारांनी प्रचाराला लागणं हे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याची लक्षण आहेत असे भाषणातून ऐकल्यानंतर व तिकीट पुन्हा आमदार पंकज भोयर यांना निश्चित झाल्यानंतर भाजपनी दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आम्ही पट्टेवार दांपत्य संपूर्ण प्रचारात सहभागी झालो ते यासाठी की भविष्यात कधी तरी म्हणजे 2024 ला वर्धा विधानसभेची उमेदवारी मला मिळेल अशी अपेक्षा होती

या निवेदनाद्वारे भाजप पक्षश्रेष्ठींना नम्र विनंती करतो की मागील 31 वर्षांपासून मी सुरेश पट्टेवार सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या घरांवर तुळशीपत्र ठेवून निशुल्क निस्वार्थ समाजसेवा करीत आलो आयुष्यात कधी भ्रष्टाचाराचा डाग लागू दिला नाही 2016 ला भारतीय जनता पक्षाच्या वतीने माझी पत्नी सौ रंजना सुरेश पट्टेवार ही नगरसेविका तथा सभापती म्हणून निवडून आली पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रभागात 7 कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली परंतु विकासकामांतूंन प्राप्त होणारं 35 लाखाचा कमिशन मात्र स्वीकारलं नाही आम्ही पट्टेवार दाम्पत्यास भ्रष्टाचाराचा किंचितही डाग नसल्यामुळे वर्धा विधानसभेतील संपूर्ण मतदार नागरिक तन मन धनांनी मला आमदार करण्यासाठी फार उत्सुक आहेत करिता माझ्यासारख्या सामान्य तथा निर्धन असलेल्या भ्रष्टाचाराचा डाग नसलेल्या ज्येष्ठ समाजसेवकाला पायात चप्पल व बूट न घालता दररोज पाच किलोमीटर शहरांत अनवाणी पायांनी फिरून निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या माझ्या सारख्या भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीने वर्धा विधानसभेची उमेदवारीची मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये