Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         नवजीवन प्रसारक शिक्षण मंडळ विरूर (स्टे.) विरूर द्वारा संचालित छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता कुंभारे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीतील मतदान प्रक्रिया समजून घेता यावी याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. मतदान प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत वर्ग 5 वी ते 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये एकूण 12 पदासाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मुख्याध्यापिका सरिता कुंभारे मॅडम यांच्या नेतृत्वात निवडणूक अधिकारी म्हणून श्री. अजयकुमार विधाते सर, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. कवीश्वर शेंडे सर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 161 मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. मतमोजणी अधिकारी म्हणून सौ. वनिता तितरे मॅडम, कु. उर्मिला निखाडे मॅडम. श्री. सुधीर आगलावे सर, श्री. संतोष पेंदोर सर यांनी काम पाहिले.

      मुख्याध्यापिका कुंभारे मॅडम यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री यश डोंगे, उपमुख्यमंत्री कु. अनुष्का मुसळे, स्वच्छता मंत्री कु. प्रिया डोंगे, क्रिडामंत्री कुणाल बोबडे, आरोग्य मंत्री कु. अक्षरा चिडे, सांस्कृतिक मंत्री कु. मानसी पेटकर, पोषण आहार मंत्री कु. कल्याणी साखरकर, परिवहन मंत्री कु. कशिश गोंडे, पर्यावरण मंत्री क्रिश नेवारे, शिक्षण मंत्री तन्मय ईखारे, कायदा सुव्यवस्था मंत्री सारंग पायपरे, विरोधी पक्ष नेता सर्वेश गोरे यांचे स्वागत केले.

 या निवडणुकीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये