Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. रमेश राजूरकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

आपल्या महाराष्ट्र राज्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता शासमार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना रु. १५०० ऐवढा आर्थिक लाभ दिल्या जाणार आहे. मागील काही दिवसांमध्ये वरोरा व भद्रावती तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी चे वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रचार प्रमुख डॉ रमेश राजूरकर यांच्या मार्फत वरोरा व भद्रावती शहर व ग्रामीण भागात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने करीता अर्ज विनामुल्य भरण्याकरीता गावोगावी व शहरामध्ये अभियान राबविल्या जात आहे.

या अभियानामार्फत वरोरा व भद्रावती तालुक्यामधील सुमारे ३००० महिलांचे अर्ज विनामुल्य यशस्वीरीत्या भरुन देण्यात आले आहे. नुकतीच चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्फत डॉ रमेश राजूरकर यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करीता सनियंत्रण व आढावा समिती मध्ये अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच श्री त्रिशुल घाटे व श्री अमित गुंडावार यांची अशासकीय सद्यस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन विनामुल्य डॉ रमेश राजूरकर यांचे वरोरा व भद्रावती येथील कर्यालयमध्ये करण्यात येईल असे आश्वासन डॉ रमेश राजूरकर यांनी दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये