Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेगांव (बु.) येथे लाळ्या – खुरकूत लसीकरण शिबिर

कृषिदूतांनी पशुपालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

 लाळ्या खुरकूत (एफएमडी) हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. ‘फुट अन्ड माऊथ डिसीज’ हा रोग गुरेढोरे, शेळी, मेंढी सह खूर असणाऱ्या प्राण्यांवर प्रभाव करतो. त्यामुळे जनावरांची कार्यक्षमता कमी होते. लाळ्या – खुरकूत प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे साधन आहे. पशुपालकांमध्ये लाळ्या – खुरकूत रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव आणि कृषि औद्यौगिक सलंग्नक कार्यक्रमांतर्गत महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित आनंद निकेतन कृषि महाविद्यालयातील कृषिदूतां तर्फे शेगांव (बु.) येथे जनावरांच्या लाळ्या – खुरकूत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

      यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ.महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. तायडे, डॉ.पोतोंड, सहा. प्राध्या. डॉ. गाजर्लावार पशुचिकित्सक ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत

रोहित गलांडे, कुणाल कोहले, संभव बैद, हर्षल खटीक, सागर जरे, प्रेम बासेवार, प्रज्वल चटकी आदींनी २०० पेक्षा अधिक जनावरांच्या सफल लसीकरणात मोलाचि कामगिरी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये