ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सावखेड भोई फाटा बायपास रोड देऊळगाव राजा येथे भरधाव वेगात येणाऱ्या कार णे मोटासायकल ला मागून धडक दिल्याने मोटासायकलस्वार जखमी झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता घडली.

फिर्यादी जखमी राजेश तेजराव जाधव यांनी ३ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कार चालक विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हान करीत आहे. सविस्तर वृत्त असे की जखमी नामे राजेश तेजराव जाधव वय 34 वर्ष धंदा मजुरी रा. मु पो सावखेड भोइ हा मोटार सायकल क्रमांक MH 28 BL 5007 ने जात असतांना सावखेड भोइ फाट्याजवळ बायपास रोडवर पाठीमागुन चारचाकी गाडी कार क्रमांक MH 02 CP 0674 च्या चालकाने त्याचे ताब्यातील गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपनाने चालवून मोटार सायकल ला धडक देवून जखमी केले व जखमी यांचा डावा पाय फॅक्चर झाला तसेच मानेच्या मणक्यास दुखापत झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये