Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील समर्थ फार्मसी डी फार्म कॉलेजला अति उत्तम मानांकन प्राप्त

श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माण शास्त्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी । नजरेत सदा नवी दिशा असावी । घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही । क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, या ओवी ला साजस, समर्थ महाविद्यालय प्रतिवर्षी गगनभरारी घेत उत्कृष्ट यश संपादन करत आहे.

या महाविद्यालयास शैक्षणिक सत्र 2023-24 करिता महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने बाह्यआवेक्षण समितीकडून अति उत्तम श्रेती श्रेणी प्रदान केली आहे. महाविद्यालय पीसीआय नवी दिल्ली, डी टी ई मुंबई, एम एस बी टी मान्यता प्राप्त महाविद्यालय आहे. वर्षातून दोन वेळेला बाह्य आवश्यक समितीकडून महाविद्यालयाच्या आवेक्शन केले जाते.

यामध्ये तज्ञांची समिती महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा महाविद्यालयाची इमारत, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग त्यांचा अनुभव त्यांचे शिक्षण, महाविद्यालयातील ग्रंथालय, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा यासंबंधीचे सखोल आवश्यक केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतला जातो महाविद्यालयाच्या लेबोरेटरीज, विद्यार्थ्यांचा निकाल या सर्व बाबींचा सखोल निरीक्षण करूनच समिती अहवाल सादर करते व त्यातूनच महाविद्यालयाची गुणवत्ता ठरवली जाते.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी देऊळगाव राजा या महाविद्यालयाला अति उत्तम असा मानांकन मिळालेला आहे . ही बाब महाविद्यालयाकरिता अत्यंत अभिमानाची आहे. मागील तीन वर्षापासून सतत अतिउत्तम हा मानांकन या महाविद्यालयाला प्राप्त झालेला आहे आणि अत्यंत कमी अवधीतच महाविद्यालयाने ही गरुड झेप घेतलेली आहे आणि आपला दर्जा व गुणवत्ता टिकवण्यास ही महाविद्यालय समर्थ आहे हे समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाने दाखवून दिलेले आहे.

या नेत्र दीपक यशाकरिता महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे ,महाविद्यालयाचे सचिव सौ नंदाताई कायंदे ,सहसचिव मनोज कायंदे, कोषाध्यक्ष सतीश कायंदे व सर्व मॅनेजमेंट टीमने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे ,डॉ. गोपाल सीताफळे, प्रा किशोर चऱ्हाटे,तसेच प्राध्यापक कोल्हे,प्राध्यापक पिंपळे,प्रा उगले, प्रा सानप,प्रा तायडे यांना शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये