Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सततच्या पावसाने ग्रामीण रस्त्याची लागली वाट – संबंधित विभागाचे दुर्लक्ष

सिंदोळा - कढोली - डोनाळा - ऊपरी रस्त्यावर जीवघेणे खड्डे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   जिल्ह्यासह तालुक्यात पावसाने कहर केल्याने ग्रामीण रस्त्याची वाट लागली असून रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असल्याने सदर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत .संततधार पावसाने गेली पंधरा दिवस कहर केल्याने जनजीवन प्रभावित झाले असून परिणामी ग्रामीण भागातील नाले फुगले वाहतूक खोळंबली नाल्यासह रस्त्यावर पाणी जमा झाल्याने पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर खड्याची निर्मिति झाली. सोबतच सदर भागालगत वैनगंगा नदी वाहत असल्याने याच भागातुन मोठ्या प्रमाणात गौनखनिज साहित्य रेती, बदरी,मुरुम आणि मातीची मोठी चोरटी वाहतूक केलि जात असल्याने सततच्या वाहतुकीमुळे सबंध रस्त्याची वाट लागली त्यातच पावसाचि भर पडून पावसाने झोडपूण टाकल्याने अवैद्य चोरटी वाहतूक आणि पावसाच्या तडाक्याने रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे.दिवस पावसाचे असल्याने रस्त्यावर पाणी साचुन राहत असून खड्याचा अंदाज समजत नसल्याने सदर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.

त्यामुळे खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असी अवस्था निर्माण झाली असून वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.अवैद्य वाहतूक आणि सततच्या पावसामुळे तालुक्यातील सिंदोळा – कढोली-डोनाळा ते ऊपरी आदि मार्गावरिल सर्व रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून सदर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.अशा गंभीर बाबिकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते सदर रस्त्याची डागडूगी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

रस्त्याच्या कामाचे टेंडर होऊनही काम झाले नाही आणि जळ चोरटी वाहतूक आणि सततच्या पावसामुळे रस्त्याची वाट लागली रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले त्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जात आहे तेव्हा किमान कमीत कमी रस्त्याची डागडुजी तरी करण्यात यावी.

किशोर वाकुडकर, सामाजिक कार्यकर्ता,उपरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये