Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

102 दात्यानी रक्तदान करून आमदार पंकजा मुंडे यांचा वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवा नेते डॉ सुनील कांयदे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याचबरोबर नरहरी नाथ महाराज संस्थान येथे गोमातांना चारा दान करण्यात आले, देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले, कमला नेहरू प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला

रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले होते पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 102 हुन दात्यानी रक्तदान करून एका विधायक कार्याला हातभार लावला

यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे, डॉक्टर शंकर तलबे, राजेश भुतडा, एडवोकेट संदीप मेहेत्रे, धर्मराज हनुमंते, डॉक्टर अक्षय कुठे यांच्या सह पंकजा मुंडे यांच्या वर प्रेम करणारे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 डॉक्टर कायंदे दापत्यांचे राष्ट्रीय कार्यात योगदान

रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे ‘रक्तदान हे जीवनदान’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव लोकनेते पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर सुनील कायंदे व त्यांच्या पत्नी डॉक्टर शिल्पा कायंदे या दापत्याने रक्तदान करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पंकजा मुंडे यांचा वाढदिवस साजरा केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये