ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले वि‌द्यालयात शालेय मंत्रिमंडळ स्थापन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विद्‌यालय, गडचांदूर येथे नुकतीच शालेय मंत्रिमंडळाची प्रत्यक्ष मतदानाव्दारे निवडणूक घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही शासन प्रणालीव्दारे निवडणूक घेण्यात आली.

शालय मुख्यमंत्री- रोहीत मेश्राम, उपमुख्यमंत्री – 3. जान्हवी विधाते, शिक्षणमंत्री- अंकुश बावणे, सांस्कृतिकमंत्री- कु. समिक्षा खोडके, संरक्षणमंत्री- कु. धनश्री विरूटकर पर्यावरणमंत्री-साहील वासेकर, क्रिडामंत्री – मयुर विरूटकर, तर स्वच्छतामंत्री कु. लायबा शेख हे विद्यार्थी विजयी झाले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जि.एन. बोबडे, एन. के. बावनकर तर मतदान अधिकारी म्हणून मरस्कोल्हे, कोंगरे, आर. पी. मांढरे, आत्राम, सी एम किन्नाके यांनी काम सांभाळले. तसेच विद्यार्थ्यांनी मतदान करण्यासाठी सुरेश पाटील, ज्योती चटप, सुषमा शेंडे, माधुरी उमरे, भुवनेश्वरी गोपमवार, चतुर्थश्रेणी कर्मचारी शशीकांत चन्ने, सुधाकर गेडाम यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये