Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजातील शेवटच्‍या घटकातील व्‍यक्‍तीच माझा प्रेरणास्‍त्रोत

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता

चांदा ब्लास्ट

‘सेवा दिवस’ म्‍हणून वाढदिवस साजरा केल्याबद्दल मानले कार्यकर्त्यांचे आभार

सर्वसामान्य जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सेवेतून मिळालेले समाजातील शेवटच्या घटकातील माणसाचे आशिर्वाद हीच माझ्या कामाची ऊर्जा आहे. यातूनच मला नवनवीन विकासात्मक कामांची प्रेरणा मिळते, अश्या भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

माझा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करत असल्याचे मला समाधान आहे. त्याबद्दल माझ्या असंख्य चाहत्यांचा, कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभारी आहे, अशी भावना राज्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त महानगर भाजपातर्फे ३० जुलै रोजी चंद्रपूर येथील गिरनार चौकात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. ना. मुनगंटीवार यांचा वाढदिवस आरोग्य महाशिबीर, रक्तदान शिबीर व विविध शासकीय लाभार्थी प्रमाणपत्र वाटप इत्यादी कार्यक्रमांसह ‘सेवादिन’ म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाला.

ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘दरवर्षी वाढदिवसाला मी मंदिरात प्रार्थनेसाठी जातो. सर्वसामान्य व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. या वर्षी मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सेवादिन म्हणून जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. सामान्य माणसाच्या हृदयातील ईश्वराचा अंश व गरीब, कष्टकरी माणसाची सेवा हेच माझ्या सामाजिक व राजकीय कार्याचे सूत्र आहे. यासाठी जनतेकडून मिळणारे प्रेम हे खरे बळ आहे.’

याचवेळी बीड येथील ना. मुनगंटीवार प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष योगेश भागवत व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना जेसीबीद्वारे १४ फूट पुष्‍पहार घालुन शुभेच्छा दिल्या. याचाही उल्‍लेख करीत ना. मुनगंटीवार यांनी योगेशचे कौतुक केले व अश्‍या कार्यकर्त्‍यांमुळेच मला कामाचे बळ मिळते, अशा भावना व्यक्त केल्या.

रक्तदान शिबिराला प्रतिसाद

चंद्रपूर महानगर भाजपा तर्फे रक्तदान शिबिराच्या प्रसंगी २०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मंचावर सौ. सपनाताई मुनगंटीवार, डॉ. तन्मय बिडवई व महानगर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या विविध विशेष पुरवण्यांचे प्रकाशन करण्यात आले. गिरनार चौकात सकाळी साडेआठपासून रक्तदान शिबिराला तरुणांनी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महानगर भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दिवसभर सेवेसाठी यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये