Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे दि. ३०/०७/२०२४ रोजी विद्यार्थी मंत्रीमंडळ व इंटरअॅक्ट क्लब ऑफ चांदा पब्लिक स्कूलची स्थापना करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण अधिकारी (प्राथ.), अश्विनी सोनवने, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर चे प्रसिडेंट रोटे. अजय पालारपवार, सचिव रोटे. मिलींद बोडखे, युथ डायरेक्टर रोटे. मनिषा पडगेलवार, तसेच शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे व प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. हिरवे रोप देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तद्वतच स्टूडंट कॅबिनेट कौन्सिल मधील सर्व विद्यार्थ्यांना तसेच नवनियुक्त आचार्य चाणक्य हाऊस मास्टर तबस्सूम खान, महर्षी पाणिनी हाऊस मास्टर लता खनके, महर्षी वेदव्यास हाऊस मास्टर शुभांगी भंडारी, महर्षी चरक हाऊस मास्टर शिखा दुबे या सर्व सदस्यांना शपथ दिल्या गेली व त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

स्टूडेंट कॅबिनेट कौन्सिल मधील सर्व विद्यार्थ्यांना आपली पात्रता सिद्ध करण्याकरीता बौध्दिक, मानसिक, शारिरीक अशा अनेक चाचण्यांमधून जावे लागते. तेव्हाच विशिष्ट पदाकरीता त्यांची नियूक्ती करण्यात येते. स्टुडंट कॅबिनेट कौन्सिल मधील नवनियूक्त सदस्यांमध्ये विद्यार्थी प्रमुख नाविण्या बटूलवार, उपविद्यार्थी प्रमुख मैत्री मेश्राम, महर्षि चरक हाऊस कॅप्टन लावण्या नगराले व अंकिता रंजन, महर्षी वेदव्यास हाऊस कॅप्टन इशिका कृष्णपल्लीवार व दृष्टि ताजने महर्षि पाणिनी हाऊस कॅप्टन रिया वर्मा व अदविता कोहपरे, आचार्य चाणक्य हाऊस कॅप्टन रिम्शा ठाकुर व विधी गौरकार या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दहावीच्या परीक्षेतील प्राविण्य प्राप्त रूत्वी धार्मिक, तनिष्का खोब्रागडे, आर्या नेवलकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इंटरअॅक्ट क्लब चा माजी अध्यक्ष ध्रुव मुंगले याने इंटरअॅक्ट क्लब अंतर्गत राबविल्या गेलेल्या उपक्रमांचा आढावा सादर केला.

कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी अश्विनी सोनवने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश उपस्थित सर्वांना दिला. रोटरी क्लबच्या युथ डायरेक्टर रोटे. मनिषा पडगेलवार यांनी इंटरअॅक्ट क्लबची स्थापना व उद्देश्य याबद्दल सर्वांना माहिती दिली. इंटरअॅक्ट क्लबच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवून नेतृत्व कौशल्य आत्मसात करता येते असे वक्तव्य अजय पालारपवार यांनी केले.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी नवनिर्वाचीत स्टुडंट कॅबिनेट कौन्सिल मधील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे स्वागतीय भाषणात म्हणाल्या की आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याची भावी पिढी तयार होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वकौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका नीलिमा पाऊनकर यांच्या सह आन्या त्यागी, आशुतोष पांडे, दिव्यानी भनारकर, अक्षरा टोकाला या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन रेवती बडकेलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी स्कूल सुपरवाइजर महेश गौरकार, कार्यक्रम प्रमुख रेवती बडकेलवार व लीडरशीप डेव्हलपमेंट इंचार्ज फहीम शेख यांचा मोलाचा वाटा होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये