Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

रेल्वे समस्यांवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शासनाला निवेदन 

चांदा ब्लास्ट

रेल्वे समस्यांवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष नंदिनी चुनारकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना शुक्रवार दिनांक २६ जुलै २०२४ रोजी निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे.

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक प्रवासी प्रवास करीत असतात. त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने लक्ष वेधले आहे. जनरल डब्ब्याविषयी निवेदनात म्हटले आहे की क्षमतेपेक्षा जास्त भीड असल्याने अधिकचे डब्बे वाढविण्यात यावेत. त्याचप्रमाणे स्वच्छता गृह व स्वच्छता या संबंधी विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

लांब पल्ल्याच्या साधारण रेल्वे सुरू करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वेटींग टिकिट वरचे कॅन्सलेशन शुल्क रद्द करण्यात यावे.कन्फर्म तिकीट चे चार्ज शुल्क कमी करण्यात यावे.

तात्काळ कोटा संबंधी अनेक गैरप्रकार होत असल्याने यासंबंधीची योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.

दिव्यांगासाठी असलेले कोच रेल्वेत मध्यभागी ठेवून त्यांना योग्य त्या सुविधा माफक दरात पुरविण्यात याव्यात.

रेल्वे मध्ये असलेल्या खाना सुविधा संबंधी रेट माहिती प्रसिद्ध करून खरेदीच्या अनुषंगाने बिल देण्यात यावे. ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणेच सवलत सुरू करण्यात यावी.

एस.एम.एस. द्वारे लेट ट्रेन ,बदलले रूट यासंबंधीची माहिती अपडेट देण्यात यावे.

रेल्वेमध्ये गुटखा, सिगारेट इत्यादी आरोग्यासाठी घातक वस्तू विक्रीवर बंदी घालण्यात यावी.

कोरोना काळात बंद पडलेले रेल्वे मार्ग पुन्हा सुरू करण्यात यावे.

याशिवाय विविध समस्या/मागण्या निवेदनाद्वारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतने रेल्वे मंत्र्यांना पाठविले असून त्या सोडविण्याची मागणी नंदिनी चुनारकर, प्रभात कुमार तन्नीरवार, अण्णाजी ढवस, वसंत वऱ्हाटे, संगिता लोखंडे, जितेंद्र चोरडिया, पुरूषोत्तम मत्ते,महेश कानपिल्लेवार, हेमराज नंदेश्वर, अशोक मुडेवार, सुषमा साधनकर, शंभू अडावतकर, सुनील वनकर,सुरेश नन्नावरे ,सुरेश तूम्मे शंकर उपरे,बबिता बोकडे,कल्पना जांगडे आदींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये